रविवारी पंढरपूरमध्ये दुकानदार व कर्मचाऱ्यांची रॅपिड अँटिजन टेस्ट होणार

पंढरपूर – शहरातील सर्व व्यापारी तसेच दुकानातील कर्मचारी, ड्रायव्हर, हमाल तोलार, दिवाणजी व इतर संपर्कात येत असलेल्या व्यक्ती यांची रॅपिड अँटिजन टेस्ट रविवारी 13 सप्टेंबर 2020 रोजी नगरपरिषदच्या सरकारी दवाखाना जुनी पेठ येथे सकाळी 11 ते दुपारी 3 यावेळेत घेण्यात येणार आहे. सर्वांनी ही टेस्ट करून घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.

जिल्हाधिकारी साहेब सोलापूर यांनी दिलेल्या निर्देशानुसार पंढरपूर शहरांमध्ये कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग लक्षात घेता तो रोखण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. याच अंतर्गत हा उपक्रम राबविला जात आहे.

नुकतीच प्रमुख व्यापाऱ्यांची बैठक माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले यांचे अध्यक्षतेखाली मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर, उपनगराध्यक्ष अनिल अभंगराव पक्षनेते गुरुदास अभ्यंकर उपमुख्य अधिकारी सुनील वाळुजकर व शहरातील व्यापारी यांच्या उपस्थितीत संपन्न झाल होती.

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!