रविवारी पंढरपूर शहर 1 व गुरसाळे येथे 3 कोरोना रुग्ण आढळले

पंढरपूर – आज रविवारी 19 जुलै रोजी पंढरपूर शहरात 1 तर ग्रामीणमध्ये गुरसाळे येथे 3 असे एकूण 4 कोरोना रुग्ण वाढले असून एकूण बाधितांची संख्या 161 इतकी झाली आहे. अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. एकनाथ बोधले यांनी दिली.

5 अहवाल प्राप्त असून निगेटिव्ह 1 तर पाँझिटिव्ह 4 आहेत. शहरात 1 तर गुरसाळे मध्ये 3 रूग्ण आढळले आहेत. 120 जणांवर सध्या उपचार सुरु आहेत. आजवर 39 जण बरे झाले आहेत. तर 2 जण मयत आहेत

आजवर पंढरपूर शहरात 117, ग्रामीणमध्ये 37 तर इतर तालुके व जिल्हयातील 7 रूग्ण आढळले आहेत.

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!