रविवारी सोलापूर जिल्हा ग्रामीणमध्ये 125 कोरोना रूग्ण वाढले, 201 जण झाले कोरोनामुक्त

सोलापूर – सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात (महापालिकाक्षेत्र वगळून) रविवार 8 नोव्हेंबर रोजी एकूण 125 कोरोना रुग्ण वाढले आहेत. सर्वाधिक कोरोनाबाधित माळशिरस व बार्शी तालुक्यात प्रत्येकी 27 आढळले आहेत. दरम्यान ग्रामीण भागात आज 201 जणांनी कोरोनावर मात केली आहे. रविवारच्या अहवालानुसार जिल्हा ग्रामीणमध्ये 7 जणांनी कोरोनामुळे प्राण गमावले आहेत. कोरोनाबाधित रूग्णांची आता संख्या कमी होताना दिसून या आजारावऱ मात करून घरी परतणार्‍यांची संख्याच वाढली आहे. जिल्हा ग्रामीण भागात कोरोनाबाधितांची एकूण संख्या 32209 इतकी झाली असून यापैकी 29530 जण कोरोनावर मात करून घरी गेले आहेत तर 1721 जणांवर उपचार सुरू आहेत. आज 201 जणांना घरी पाठविण्यात आले आहे. आजवर 958 जणांनी या आजारात प्राण गमावले आहेत.आजच्या अहवालानुसार 7 जण मयत आहेत.

पंढरपूर तालुक्यात 24 रूग्ण वाढले

पंढरपूर- रविवार 8 नोव्हेंबर रोजी आलेल्या जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या अहवालानुसार पंढरपूर शहर 6 व तालुक्यात ग्रामीणमध्ये 18 असे 24 कोरोनाबाधित रूग्ण वाढले आहेत.पंढरपूर शहर व तालुक्यात एकूण कोरोनाबाधितांची संख्या 6 हजार 446 झाली आहे. आजच्या अहवालानुसार 1 जण मयत आहेत. आजवर कोरोनामुळे प्राण गमावलेल्यांची एकूण संख्या 193 झाली आहे. सध्या एकूण 495 रूग्णांवर उपचार सुरू असून,आजवर 5758 जण कोरोना आजारातून बरे झाले आहेत .

One thought on “रविवारी सोलापूर जिल्हा ग्रामीणमध्ये 125 कोरोना रूग्ण वाढले, 201 जण झाले कोरोनामुक्त

  • March 17, 2023 at 10:02 am
    Permalink

    Hey are using WordPress for your site platform? I’m new to the blog world but I’m trying to get started and create my own. Do you need any html coding expertise to make your own blog? Any help would be greatly appreciated!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!