*राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वीजबिलांचा ७३ लाख ग्राहकांकडून ‘ऑनलाईन’ भरणा
मुंबई, दि. ६ – कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे सध्या राज्यात ‘लॉकडाऊन’ असल्याने महावितरणच्या लघुदाब वर्गवारीतील ७३ लाख २९ हजार वीजग्राहकांनी घरबसल्या गेल्या महिन्यात १२२७ कोटी २५ लाख रुपयांचा ‘ऑनलाईन’ वीजबिल भरणा केला आहे. यामध्ये सर्वाधिक पुणे परिमंडलातील १३ लाख ५०हजार तसेच भांडूप परिमंडलातील 11 लाख वीजग्राहकांचा समावेश आहे.
सद्यस्थितीत राज्यामध्ये कोरोना विषाणूंचा संसर्ग रोखण्यासाठी विविध उपाययोजना सुरु आहेत. तसेच येत्या १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र देखील बंद आहेत. मात्र वीजग्राहकांनी महावितरणची www.mahadiscom.in वेबसाईट, मोबाईल ॲप किंवा इतर ‘ऑनलाईन’ पर्यांयाद्वारे वीजबिलांचा घरबसल्या भरणा करून सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणकडून केले जात आहे.
गेल्या मार्च महिन्यात ७३ लाख २९ हजार ग्राहकांनी घरबसल्या १२२७ कोटी २५ लाख रुपयांच्या वीजबिलांचा ‘ऑनलाईन’ भरणा केला. यामध्ये परिमंडलनिहाय ग्राहकसंख्या व रक्कम पुढीलप्रमाणे – पुणे– १३.५० लाख – २६६.२९ कोटी, भांडूप– १०.९९ लाख – २३३.६० कोटी, कल्याण– १०.२५ लाख – १६४.३९ कोटी, नाशिक– ५.६५ लाख – ९४.४१ कोटी, बारामती– ५.६३ लाख – ७१.०९ कोटी, कोल्हापूर– ४.२२ लाख – ८४.९६ कोटी, नागपूर– ४.०५ लाख – ७०.७५ कोटी, जळगाव- ३.२५ लाख – ४७.८७ कोटी, औरंगाबाद– २.३० लाख – ४३.७५ कोटी, अकोला– २.२७ लाख – २७.१० कोटी, अमरावती- २.२१ लाख – २३.४८ कोटी, लातूर- १.९२ लाख – २५.५३ कोटी, कोकण- १.८८ लाख – २२.९२ कोटी, चंद्रपूर- १.७९ लाख – १५.३६ कोटी, गोंदिया- १.७९ लाख – १२.८२ कोटी, नांदेड- १.५८ लाख – २२.९१ कोटी.
‘लॉकडाऊन’मुळे महावितरणकडून २३ मार्चपासून वीजबिलांची कागदी छपाई व वितरण बंद करण्यात आले आहे. मात्र मोबाईल क्रमांकांची नोंदणी केलेल्या ग्राहकांना ‘एसएमएस’द्वारे वीजबील पाठविण्यात येत आहे. याशिवाय वेबसाईट व मोबाईल ॲपवर वीजबिल पाहण्यासाठी व भरणा करण्यासाठी उपलब्ध आहेत. क्रेडीट कार्ड वगळता महावितरणचे लघुदाब वर्गवारीचे वीज बिल भरण्यासाठी ‘ऑनलाईन’चे उर्वरित सर्व पर्याय आता निःशुल्क आहेत.
नेटबॅकींगचा अपवाद वगळता वीजबिलांचा ‘ऑनलाईन’ भरणा करण्यासाठी याआधी ५०० रुपयांपेक्षा अधिक रकमेवर शुल्क आकारण्यात येत होते. परंतु क्रेडीट कार्ड वगळता नेटबॅकिंग, डेबीट कार्ड, कॅशकार्ड, यूपीआय, डिजिटल वॉलेटच्या माध्यमातून ‘ऑनलाईन’द्वारे होणारा वीज बिल भरणा आता निःशुल्क आहे. तसेच ‘ऑनलाईन’ बिल भरण्यासाठी ०.२५ टक्के सूट दरमहा ५०० रुपयांच्या मर्यादेत देण्यात येत आहे. लघुदाब वर्गवारीतील सर्व वीजग्राहकांनी घरबसल्या महावितरणची वेबसाईट, मोबाईल ॲप किंवा इतर ‘ऑनलाईन’ पर्यांयाद्वारे वीजबिलांचा भरणा करून सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणने केले आहे.
महावितरणने वीजग्राहकांसाठी तयार केलेले मोबाईल अॅप इंग्रजी व मराठी भाषेत उपलब्ध आहे. या ॲपमध्ये सर्व प्रकारच्या सुविधा दिलेल्या आहेत.
प्रामुख्याने एकाच खात्यातून ग्राहकांना स्वतःच्या अनेक वीजबिलांचा भरणा करण्याची सोय आहे. चालू व मागील वीजबिल पाहणे आणि त्याचा ऑनलाईन भरणा करणे शक्य झाले आहे. त्यासाठी नेटबॅकींग, क्रेडीट/डेबीट कार्डासह मोबाईल वॅलेट व कॅश कार्ड्सचा पर्याय उपलब्ध आहे. तसेच भरलेल्या पावतीचा तपशीलही वेबसाईट व अॅपवर उपलब्ध आहे.
essay marking service can i hire someone to write my essay essay outline help
write my essay canada nursing essay help best article writing service
help with argumentative essay need help with essay writing need help with essay
keck science thesis example of a good thesis statement senior thesis uf
what should be included in a thesis statement thesis proposal presentation thesis support
what does a thesis statement look like what is a working thesis statement thesis length
thesis presentation frederick jackson turner frontier thesis help with a thesis statement