राज्य मराठी पत्रकार परिषदेच्या प्रसिद्धी प्रमुखपदी “पंढरी संचार” चे अनिरुद्ध बडवे

सोलापूर – राज्य मराठी पत्रकार परिषदेच्या प्रसिध्दी प्रमुखपदावर सोलापूर जिल्ह्यातून दै. पंढरी संचार चे अनिरुद्ध बडवे यांची नियुक्ती करण्यात आली आहे .
मराठी परिषदेचे मुख्य विश्वस्त एस . एम. देशमुख , विश्वस्त किरण नाईक , कार्याध्यक्ष शरद पाबळे यांनी पुणे विभागातील निवडी आज जाहीर केल्या. यामध्ये पुणे जिल्ह्यासाठी लोकमतचे भरत अर्जुन निगडे तर सातारा जिल्ह्यासाठी दीपक शिंदे यांचीही नियुक्ती आज जाहीर करण्यात आली .
अनिरुद्ध बडवे हे गेल्या 15 वर्षापासून आधिस्विकृतीधारक पत्रकार असून पंढरी संचार चे कार्यकारी संपादक म्हणून काम करीत आहेत. माध्यमातील अनेक उपक्रमांमध्ये त्यांचे योगदान असते . आर्ट ऑफ लिविंग , लोकमंगल पतसंस्था, एक्सेल फाउंडेशन अशा अनेक संस्थांच्या माध्यमातून कार्यरत राहून त्यांनी सामाजिक कामांमध्ये भरीव योगदान दिले आहे . त्यांनी यापूर्वी सोलापूर जिल्हा मराठी पत्रकार संघाचे सचिव तसेच पंढरपूर पत्रकार संघाचे अध्यक्ष म्हणूनही काम पाहिले आहे .
कृष्णा एजूकेशन फाउंडेशन कराड , सिंहगड ग्रुप , पुणे यांच्या अनेक प्रकाशन उपक्रमातही त्यांचा सहभाग आहे . ‘कृष्णा’ च्या पायोनियर संपादकीय मंडळातील बडवे हे एक सदस्य आहेत. या माध्यमातून मराठी परिषदेसारख्या शीर्षस्थ संस्थेच्या राज्य स्तराशी थेट संपर्कातून काम करण्याची संधी त्याना मिळत आहे.
या निवडी नंतर परिषदेचे संजीव देशमुख , शरद पाबळे , सोलापूर येथील सचिव पी . पी. कुलकर्णी , यांनी श्री बडवे यांचे अभिनंदन केले
WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!