राष्ट्रवादीच्या रक्तदान शिबिरास आटपाडीत मोठा प्रतिसाद

आटपाडी दि .१० -राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या २१ व्या वर्धापन दिनानिमित आटपाडीत आयोजित रक्तदान शिबिरात १०५ रक्तदात्यांनी रक्तदान करून मोठा प्रतिसाद दिला .
आटपाडी पंचायत समितीच्या सभागृहात या रक्तदान शिबिराचे उदघाटन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष अँडव्होकेट बाबूराव मुळीक यांचे हस्ते करण्यात आले .
प्रारंभी आटपाडी तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष हणमंतराव देशमुख ,युवक अध्यक्ष सूरज पाटील , महिला अध्यक्षा अश्विनी अष्टेकर कासार , निवृत्त प्राध्यापक संभाजीराव पाटील , अधिकारी चंद्रकांत पारसे यांच्यासह १०५ जणांनी रक्तदान करून मोलाचे योगदान दिले .
यावेळी राष्ट्रवादीचे ज्येष्ट नेते रावसाहेबकाका पाटील, राष्ट्रवादीचे प्रदेश कार्यकारणी सदस्य सादिक खाटीक ,महिला नेत्याअनिता पाटील , ओबीसी सेलचे अध्यक्ष जालिंदर कटरे, , शहराध्यक्ष संभाजीराव पाटील , युवक उपाध्यक्ष किशोर गायकवाड, तेजस पवार , विजय पुजारी ,जितेंद्र चव्हाण , भाऊसाहेब देशमुख ,सुधीर देशमुख ,रोहीत देशमुख, नितीन डांगे , अमित पाटील , समाधान नळ , प्रशांत गवळी, सलमान शेख , दत्ता रावळ हे उपस्थित होते . माणगंगा उद्योग समुहाचे आनंदरावबापू पाटील यांनी शिबिर स्थळी भेट दिली .
भारती ब्लड बॅंक सांगलीच्या डॉ . यास्मीन धत्तुरे , रणजित जाधव व सहकाऱ्यांनी रक्त संकलन केले .

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!