पंढरपूर – शहरात शुक्रवार 10 जुलै रोजी सकाळी 6 रूग्ण आढळून आले होते. यात तालुक्यातील आणखी दोन जणांची सायंकाळी भर पडली असून एक महिला वाखरी येथील आहे तर एक तरूण रूग्ण तालुक्यातीला ईश्वरवठार येथील आहे. यामुळे आजच्या दिवसभरात एकूण 8 रूग्ण आढळून आले आहेत. यामुळे येथे आजवर आढळून आलेल्या रूग्णांची संख्या 49 इतकी झाली आहे.
एकूण 44 अहवाल शुक्रवारी प्राप्त झाले आहेत यापैकी 36 निगेटिव्ह आहेत तर आठ पॉझिटिव्ह आहेत. काल दहा जणांना उपचारानंतर दवाखान्यातून घरी सोडण्यात आले आहे.