वाढीव वीज बिल कमी न झाल्यास पंढरीत  धरणे आंदोलनाचा इशारा

पंढरपूर- मार्च 2020 पासून कोरोनामुळे लॉकडाऊन पुकारण्यात आला होता. या काळात सर्व व्यवसाय ठप्प होते. अशा काळात राज्यातील घरगुती व व्यावसायिक वीजग्राहकांना वाढीव बिल आली असून यामुळे नागरिकांमध्ये नाराजी आहे. ही बिल कमी करण्यात यावीत अन्यथा धरणे आंदोलन करण्याचा इशारा समाजसेवक संतोष कवडे यांनी दिला आहे.
दरम्यान वाढीव वीज बिलाबाबत वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली. तसचे बिले कमी करून मिळावीत याचे निवेदन वीज कंपनी अधिकारी भुतडा यांना देण्यात आले. तसेच कवडे यांनी प्रांताधिकरी सचिन ढोले यांची भेट घेवून वीज ग्राहकांच्या समस्यांबाबत त्यांच्याशी चर्चा केली आहे. दरम्यान वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार 3 टप्प्यात थोडे थोडे वीज बिल भरता येवू शकते तसेच एकदम पैसे भरले तर 2 टक्के सूट देण्याच आश्वासन देण्यात आले आहे. आता शहरातील वीज ग्राहकांशी चर्चा करून तसेच त्यांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी बैठक बोलाविण्याचे वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांनी मान्य केले आहे. या काळात वीज बिल न भरल्याच्या कारणास्तव कोणाच्या घराची अथवा व्यवसायाची वीज तोडू नये असे आवाहन संतोष कवडे यांनी केले आहे. तसेच जरवीज तोडली गेली तर आमच्याशी नागरिकांची संपर्क साधावा असे आवाहन त्यांनी केले आहे.
यावेळी एस.पी. गायकवाड, नीलेश कोरके, विशाल आर्वे, स्वप्निल घुले, विनोद लटके, दत्ता लटके,विकी झेंड,तात्या जगताप, अतुल लटके, बाबू थिटे, शिवाजी नवत्रे, राज थिटे, दीपक नवत्रे व इतर अनेक कार्यकर्ते उपस्थित होते
WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!