विठुरायाच्या नगरीला क्रीडा पंढरी अशी नवी ओळख मिळवून देऊ : बीसीसीआयचे पीच क्युरेटर महामुनकर यांची ग्वाही

पंढरपूर – भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआयचे) जेष्ठ पीच क्युरेटर रमेश महामुनकर यांनी आज बुधवारी अनवली येथे साकारत असलेल्या आंतरराष्ट्रीय मानांकनाच्या खेळपट्टीला भेट दिली .
यावेळी क्रिकेट असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी त्यांचे स्वागत केले .
यावेळी श्री. राजेन्द्रसिंह सूर्यवंशी , वैभव बडवे , पत्रकार अनिरुद्ध बडवे , वसंतराव देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी श्री महामुनकर यांनी संपूर्ण क्रीडांगणाच्या जागेची पाहणी करून पीच संबंधित सूचना केल्या . याठिकाणी 8 पीच ( खेळपट्या ) बनविण्यात आल्या असून सुमारे पाच एकर जागेमध्ये क्रीडांगणाचे काम सुरू आहे.

पाहणीनंतर आ. मोहिते-पाटील आणि महामुनकर यांनी याठिकाणी इंविटेशन मॅचेस तसेच जिल्हास्तरीय क्रिकेट सामने आयोजित करण्याबाबत चर्चा केली .
बीसीसीआयकडे याबाबत पाठपुरावा करण्याचे आश्वासन महामुनकर यांनी दिले तर क्रिकेट मंडळाकडे निमंत्रणे पाठवून क्रीडांगणाच्या विकासासाठी पाठपुरावा करण्याबाबतचे आश्वासन आ. मोहिते पाटील यांनी दिले.
यावेळी महामुनकर यांनी सांगितले की , या भागात सोलापूर आणि कोल्हापूर वगळता कुठेही असे भव्य क्रीडांगण नाही . येथे खूप मोठा विकास करण्याचा करण्याची मुभा आहे. विठुरायाच्या पंढरीची जशी ओळख आहे तशी क्रीडा पंढरी म्हणून एक नव्याने ओळख निर्माण होण्याची मोठी संधी आहे , त्यामुळे राष्ट्रीय खेळाडू तसेच पीच स्पेशालिस्ट आणि ट्रेनर यांच्याकडून मार्गदर्शन घेऊन या ठिकाणाचा विकास आपण साधू.
मोहिते पाटील यांनी सांगितले की, मी स्वतः या येथील रेल्वे ग्राउंड वर आणि वाळवंटावर अनेक वर्षे क्रिकेट खेळलो आहे. तेथील खेळाडूंना मूलभूत व्यवस्था निर्माण होण्यासाठी हे खूप महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे. यावेळी त्यांनी श्री . सूर्यवंशी आणि बडवे यांचे अभिनंदन केले.

4,970 thoughts on “विठुरायाच्या नगरीला क्रीडा पंढरी अशी नवी ओळख मिळवून देऊ : बीसीसीआयचे पीच क्युरेटर महामुनकर यांची ग्वाही