विविध निवडणुकांपूर्वी पंढरपूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसची जंब्बो कार्यकारिणी जाहीर

पंढरपूर – विधानसभेसह येथे आगामी काळात होऊ घातलेल्या इतर निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर पंढरपूर तालुक्यात राष्ट्रवादीची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. जिल्हाध्यक्ष बळीरामकाका साठे यांच्या अध्यक्षतेखाली नूतन पदाधिकार्‍यांच्या निवडी करण्यात आल्या.
यावेळी राज्य उपाध्यक्ष शफीभाई इनामदार, जिल्हा उपाध्यक्ष युवराज पाटील,विठ्ठल कारखान्याचे अध्यक्ष भगीरथ भालके, युवक राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष गणेश पाटील, तालुकाध्यक्ष अ‍ॅड. दीपक पवार, शहराध्यक्ष सुधीर भोसले,जिल्हा संघटक नरहरी देशमुख ,संकेत ढवळे, ओबीसी सेल जिल्हाध्यक्षा साधना राऊत, अनिता पवार,श्रीकांत शिंदे ,चारुशीला कुलकर्णी उपस्थित होते.
इसबावी येथील राष्ट्रमाता जिजाऊ सभागृहात राष्ट्रवादीच्या नूतन पदाधिकार्‍यांच्या निवडी जाहीर करण्यात आल्या.
यात अ‍ॅड.दीपक पवार यांच्या अध्यक्षतेखाली तालुका कार्यकारणीमध्ये प्रवीण भोसले व अनिल मोरे यांची कार्याध्यक्ष म्हणून तर उपाध्यक्षपदी रणजित लामकाने, संतोष नाईकनवरे, रावसाहेब नागणे, बाळासाहेब जाधव, संजय बाबर,दिलीप साळुंखे यांची निवड करण्यात आली आहे.
अन्य पदाधिकारी पुढील प्रमाणेः मुख्य संघटक – समीर मोरेख, संघटक- चंद्रकांत जाधव, चंद्रकांत महाडिक, रवींद्र देठे, सिद्धेश्‍वर पवार, शरद पाटील. सरचिटणीस- मारुती पोरे, उत्तम घाडगे, धोंडीराम घोलप, नेताजी कडलासकर.
राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्ष- शहाजी मुळे , सरचिटणीस- रमेश चिखलकर. राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष – संतोष चव्हाण , कार्याध्यक्ष- बालाजी आटकळे व बालाजी कवडे. उपाध्यक्ष – अमोल नागणे, नवनाथ आसबे, हनुमंत बागल. संघटक – सुहास काळे, सचिन देठे पाटील, शिवाजी नाईकनवरे,धनाजी डोंगरे, संजय शिंदे, सदाशिव भाटेकर, सारंग महामुनी. सरचिटणीस- औदुंबर चव्हाण, अजिंक्य सपाटे, नीलेश गंगणमले, पवन पाटील,सतीश जाधव.
यावेळी राष्ट्रवादी पदवीधर सेल, महिला आघाडी, ओबीसी सेल, ओबीसी महिला आघाडी,डॉक्टर सेल,किसान सेल,सेवादल अशा सर्व विभागाच्या नूतन पदाधिकार्‍यांच्याही निवडी करण्यात आल्या.
ओबीसी सेलच्या तालुकाध्यक्ष – अरुण पांढरे,कार्याध्यक्ष- गोपाळ शिंदे,उपाध्यक्ष -किशोर खरडकर, अरुण शिंदे.
पदवीधर सेल तालुकाध्यक्ष – संजय डुबल,कार्याध्यक्ष- समाधान चव्हाण,शरद चव्हाण,उपाध्यक्ष- सचिन नकाते.
डॉक्टर सेल तालुका अध्यक्ष -अमृता पवार, किसान सेलच्या कार्याध्यक्ष- बाळासाहेब पाटील,जिल्हा उपाध्यक्ष विठ्ठल मासाळ. महिल तालुका कार्याध्यक्ष- राजश्री ताड , सेवादल सेलच्या तालुका उपाध्यक्ष -संतोष इनामदार.
WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!