विस्थापित नगरातील नुकसानग्रस्तांना मनसे मदत करणार: दिलीप धोत्रे

पंढरपूर – पंढरपूर नगरपालिकेने शहरांतील विस्थापित नगरमधील लोकांची घरे आणि छोट्या व्यापाऱ्यांचे अतिक्रमण हटाव दरम्यान नुकसान केले. याची पाहणी मनसेचे राज्याचे नेते दिलीप धोत्रे यांनी केली असून जे काही नुकसान झाले आहे त्याची भरपाई करून देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

या विस्थापित नगर मधील अनेकांच्या घरांचे नुकसान झाले असू त्यांच्या घराचे पत्रे, वासे, लाईट कनेक्शन आदी साहित्याचे जे नुकसान झाले आहे ,त्यासाठी आपण मदत करणार असल्याचे दिलीप धोत्रे यांनी या भागातील भेटी दरम्यान सांगितले आहे.यावेळी, तालुका अध्यक्ष शशिकांत पाटील, वैभव इंगोले, प्रथमेश पवार, प्रताप भोसले व मनसे पदाधिकारी उपस्थित होते.
कोरोनाच्या संकटामुळे सर्वच लोक अडचणीत आले आहेत. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत, अनेकजण बेरोजगार झाले आहेत. अशातच शहरातील अनेक गरीब कुटुंबे ज्यांना राहायला घर नाही ,स्वतःची जागा नाही अशी कुटुंबे गेली कित्येक वर्षे नगरपालिकेच्या जागेत राहत आहेत. त्या ठिकाणी वीज, पाणी, रस्ते शा सुविधा आहेत, त्या ठिकाणी नगरपालिकेने कारवाई करू नये.
गोरगरीब जनतेला नाहक त्रास देऊ नये, कोणाचे तरी ऐकून जर गोरगरीब जनतेचे संसार उध्वस्त करणार असतील तर ते मनसे कदापिही खपवून घेणार नाही.गोरगरीब जनतेसाठी मनसे रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल याची नोंद घ्यावी असा इशारा धोत्रे यांनी दिला आहे.

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!