
पंढरपूर – मागील काही दिवसापासून पंढरपूर,सांगोला, माळशिरस,मंगळवेढा या तालुक्यातील शेतकर्यांच्या कृषीपंपाचा वीज पुरवठा कुठलीही पूर्वसूचना न देता व थेट डीपीतून खंडित केला जात असल्याच्या तक्रारी शिवसेनेच्या पदाधिकार्यांकडे प्राप्त होत होत्या.याची तत्काळ दखल घेत सांगोल्याचे शिवसेनेचे आमदार शहाजीबापू पाटील,शिवसेना जिल्हा प्रमुख संभाजी शिंदे,भैरवनाथ शुगरचे व्हा.चेअरमन अनिल सावंत,महिला आघाडी जिल्हा प्रमुख शैला गोडसे यांच्यासह शिवसेनेच्या अनेक वरिष्ठ पदाधिकार्यांच्या शिष्टमंडळाने बुधवारी महावितरण पंढरपूरचे कायर्कारी अभियंता सचिन गवळी यांची भेट घेत जनतेकडून प्राप्त होत असलेल्या तक्रारीची माहिती दिली व वीज बिल वसुली प्रक्रिया आणि वीज पुरवठा खंडित न करण्याबाबत महत्वपूर्ण चर्चा केली.
या बाबत शिवसेनेचे आमदार शहाजीबापू पाटील,पंढरपूर विभाग जिल्हा प्रमुख संभाजी शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार शिवसेनेच्या शिष्टमंडळाने कार्यकारी अभियंता यांच्या निदर्शनास अनेक बाबी आणून दिल्या आहेत.राज्य शासनाने मागील थकीत वीज बिलात 50 टक्के माफीची घोषणा केली आहे.मात्र 2017 पासूनचे कृषी पंपाचे बिले अनेक शेतकर्यांना मिळालेच नाहीत.तर अनेक ठिकाणी थेट कुठलीही पूर्वसूचना न देता डीपीतून वीजपुरवठा खंडित करण्यात येत आहे हा प्रकार चुकीचा असल्याचे कार्यकारी अभियंता गवळी यांच्या निदर्शनास आणले. लोकांचे प्रबोधन करा,त्यांना पूर्वसूचना द्या अशा सूचना केल्या. तर भैरवनाथ शुगरचे व्हा.चेअरमन अनिल सावंत यांनी थेट डीपीवरून सर्वच शेतकर्याचे कनेक्शन बंद करणे चुकीचे असून त्यामुळे अंशतः अथवा पूर्ण बिल भरलेल्या शेतकर्यांवर अन्याय होत असल्याची बाब कार्यकारी अभियंता गवळी यांच्या निदर्शनास आणून दिली.
यावेळी आमदार शहाजी पाटील यांनी शेतकर्यांचे वीज कनेक्शन पूर्वसूचना न देता बंद करण्याऐवजी वाढीव वीज बिलाबाबतच्या तक्रारींचे निराकरण करून प्रति हॉर्स पॉवर 1 हजार रुपये प्रमाणे भरावेत,जिल्हा परिषद गट निहाय कक्ष स्थापन करुन वाढीव वीज बीलाच्या तक्रारीचे निराकरण करावे,स्पीकरच्या माध्यमातून सार्वजनिक सुचना करीत शेतकर्यांचे प्रबोधन करावे अशी सूचना केली.
यावेळी बाबुराव गायकवाड,शहाजी नलवडे,तानाजी देशमुख,शिवसेना जिल्हा उपप्रमुख सुधीर अभंगराव,पंढरपूर तालुका प्रमुख महावीर देशमुख,सांगोला तालुका प्रमुख सूर्यकांत घाडगे,संजय घोडके,जयवंत माने,माउली अष्टेकर,काका बुराडे,पोपट सावंतराव,अविनाश वाळके,तानाजी मोरे,दीपक गवळी,लकुमान इनामदार,शंकर मेटकरी,सचिन काळे,संतोष खडतरे,अर्जुन वाघ आदींसह शिवसेनेचे पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते.
My brother recommended I might like this website. He was entirely right. This post actually made my day. You can not imagine simply how much time I had spent for this information! Thanks!