व्यंकटेश्वरा साखर कारखाना गळीत हंगामासाठी सज्ज – चेअरमन अभिजित पाटील

नांदेड– लोहा (शिवणी जमगा) जिल्हा नांदेड येथील व्यंकटेश्वरा साखर कारखाना युनिट ३ च्या पहिल्या गळीत हंगामाचे मिल रोलर पूजन प्रगतशील शेतकरी गंगाधर बाबा जामगे यांच्या शुभहस्ते बुधवारी पार पडले. हा कारखाना २०२०-२१ च्या गळीत हंगामासाठी सज्ज असल्याचे चेअरमन अभिजित पाटील यांनी सांगितले.

गेल्या वर्षी या कारखान्याचा पहिला चाचणी गळीत हंगाम घेण्यात आला होता, कारखाना लगतच गोदावरी नदी असल्याने येथे भरपूर ऊस उपलब्ध होत आहे. यावर्षी पाऊसकाळ चांगला असल्याने शेतकऱ्यांनी सुद्धा यंदा ऊस लागवड मोठ्या प्रमाणात केली आहे, या हंगामात पूर्ण क्षमतेने कारखाना चालवून ५ लाख मे. टन उसाचे गाळप केले जाईल, शेतकऱ्यांनी कारखानाकडे ऊस नोंदणी करावी व ऊस गाळपासाठी निश्चिंत राहावे. सर्व उसाचे गाळप होईपर्यंत कारखाना चालू ठेवला जाईल.सर्व ऊस गाळपास आणला जाईल. वाहनाचे करार पूर्ण करुन घेऊन हंगाम वेळेत सुरु होईल.सध्या कोरोनाच्या काळामध्ये कर्मचाऱ्यांना काळजी घ्यावी असे चेअरमन अभिजित पाटील यांनी सांगितले. यावेळी त्यांनी येत्या गळीत हंगामासाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी माउली जामगे, गंगामामा जामगे, कारखान्याचे जनरल मॅनेजर संजय पाटील, हनुमंत पाटील, धाके, चिफ इंजिनीअर पवार, चिफ केमिस्ट पेटे, शेती अधिकारी जाधव व कर्मचारी उपस्थित होते..

115 thoughts on “व्यंकटेश्वरा साखर कारखाना गळीत हंगामासाठी सज्ज – चेअरमन अभिजित पाटील

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!