शनिवारच्या अहवालानुसार सोलापूर जिल्हा ग्रामीणमध्ये 316 रुग्ण वाढले तर 707 झाले कोरोनामुक्त

सोलापूर– सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात (महापालिकाक्षेत्र वगळून) शनिवारी 26 सप्टेंबर रोजी एकूण 316 कोरोना रुग्ण वाढले आहेत. सर्वाधिक कोरोनाबाधित सांगोला तालुक्यात 68 आढळले आहेत. दरम्यान ग्रामीण भागात आज 707 जणांनी कोरोनावर मात केली आहे. शनिवारी जिल्हा ग्रामीणमध्ये 12 जणांनी कोरोनामुळे प्राण गमावले आहेत.कोरोनाचा प्रसार वेगाने होत असला तरी या आजारावर मात करून घरी परतणार्‍यांची संख्या ही दिवसेंदिवस वाढत आहे. दरम्यान ग्रामीण भागात कोरोनाबाधितांची एकूण संख्या 23561 इतकी झाली असून यापैकी 16846 जण कोरोनावर मात करून घरी गेले आहेत तर 6070 जणांवर उपचार सुरू आहेत. आज 707 जणांना घरी पाठविण्यात आले आहे. आजवर 645 जणांनी या आजारात प्राण गमावले आहेत.आजच्या अहवालानुसार 12जण मयत आहेत.

पंढरपूर तालुक्यात 56 रुग्ण वाढले

पंढरपूर – शनिवारी 26 सप्टेंबर रोजी आलेल्या जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या अहवालानुसार पंढरपूर शहर 20 व तालुक्यात 36 असे 56 कोरोनाबाधित रूग्ण वाढले आहेत.पंढरपूर शहर व तालुक्यात एकूण कोरोनाबाधितांची संख्या 4 हजार 593 झाली आहे. आजच्या अहवालानुसार 3 जण मयत आहेत. आजवर कोरोनामुळे प्राण गमावलेल्यांची एकूण संख्या 112 झाली आहे.एकूण 676 रूग्णांवर उपचार सुरू असून,आजवर 3805 जण कोरोना आजारातून बरे झाले आहेत .

1,069 thoughts on “शनिवारच्या अहवालानुसार सोलापूर जिल्हा ग्रामीणमध्ये 316 रुग्ण वाढले तर 707 झाले कोरोनामुक्त