शुक्रवारच्या अहवालानुसार सोलापूर जिल्हा ग्रामीणमध्ये 434 रुग्ण वाढले, आजही माळशिरस तालुका 102 संख्येसह आघाडीवर

सोलापूर– सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात (महापालिकाक्षेत्र वगळून) शुक्रवारी 25 सप्टेंबर रोजी एकूण 434 कोरोना रुग्ण वाढले आहेत. सर्वाधिक कोरोनाबाधित माळशिरस तालुक्यात 102 आढळले आहेत. दरम्यान ग्रामीण भागात आज 314 जणांनी कोरोनावर मात केली आहे. शुक्रवारी जिल्हा ग्रामीणमध्ये 5 जणांनी कोरोनामुळे प्राण गमावले आहेत.कोरोनाचा प्रसार वेगाने होत असला तरी या आजारावर मात करून घरी परतणार्‍यांची संख्या ही दिवसेंदिवस वाढत आहे. दरम्यान ग्रामीण भागात कोरोनाबाधितांची एकूण संख्या 23104 इतकी झाली असून यापैकी 15244 जण कोरोनावर मात करून घरी गेले आहेत तर 7227 जणांवर उपचार सुरू आहेत. आज 314 जणांना घरी पाठविण्यात आले आहे. आजवर 633 जणांनी या आजारात प्राण गमावले आहेत.आजच्या अहवालानुसार 5जण मयत आहेत.

पंढरपूर तालुक्यात 78 रुग्ण वाढले

पंढरपूर – शुक्रवारी 25 सप्टेंबर रोजी आलेल्या जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या अहवालानुसार पंढरपूर शहर 18 व तालुक्यात 60 असे 78 कोरोनाबाधित रूग्ण वाढले आहेत.पंढरपूर शहर व तालुक्यात एकूण कोरोनाबाधितांची संख्या 4 हजार 537 झाली आहे. आजवर कोरोनामुळे प्राण गमावलेल्यांची एकूण संख्या 109 झाली आहे.एकूण 1060 रूग्णांवर उपचार सुरू असून,आजवर 3368 जण कोरोना आजारातून बरे झाले आहेत .

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!