शुक्रवारी पंढरीत श्रध्दांजली सभा

पंढरपूर – सोलापूर जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते माजी आमदार कै.सुधाकरपंत परिचारक आणि श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे संचालक कै.राजूबापू पाटील यांचे नुकतेच दुःखद निधन झाले. या दोन्ही नेत्यांच्या निधनामुळे राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, कृषी अशा सर्वच क्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांना श्रध्दांजली वाहण्यासाठी सर्वपक्षीय श्रध्दांजली सभेचे आयोजन शुक्रवार 21 रोजी करण्यात आले आहे. अशी माहिती आमदार भारत भालके यांनी दिली.
पंढरपूरमधील श्रीसंत तनपूरे महाराज मठामध्य 21 ऑगस्ट रोजी दुपारी चार वाजता ही सर्वपक्षीय श्रध्दांजली सभा होणार असून यासाठी सर्वपक्षीय व सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन आमदार भारत भालके यांनी केले आहे.

1,117 thoughts on “शुक्रवारी पंढरीत श्रध्दांजली सभा