समृध्दीमध्ये ट्रॅक्टरवर गणरायाची प्रतिष्ठापना, प्रथम शेतकरी ग्राहकाच्या हस्ते श्रींचे पूजन

आपला भारत देश हा कृषीप्रधान असून सध्याच्या युगात ट्रॅक्टर हे शेतीसाठी मुख्य अवजार बनले आहे. यामुळे ग्रामीण भागात शेतीसाठी टॅ्रक्टरला चांगली मागणी आहे. यंदाचा गणेशोत्सव हा कोरोनाच्या सावटाखाली साजरा होत असला तरी उत्साह कमी नाही. अनेकांनी कोरोनाविषयक सर्व आरोग्याचे नियम पाळून श्री गणेशाची स्थापना केली आहे. येथील समृध्दी ट्रॅक्टर या सोनालिका ट्रॅक्टरच्या शोरूममध्ये ट्रॅक्टरवर श्री गणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. येथे आलेल्या शेतकरी ग्राहकाच्या हस्ते श्रींचे पूजन करण्यात आले.
साध्या पद्धतीने मात्र अगळी वेगळी संकल्पना राबवून हा देखावा साकारण्यात आला आहे. समृध्दी ट्रॅक्टर हे पंढरपूर तालुक्यातील शेतकर्यांच्या हक्काचे शोरूम असून नेहमीच त्यांनी शेतकर्यांच्या हिताला प्राधान्य दिले आहे. आपला देश व राज्य कोरोनामुक्त व्हावे असे साकडे धाराशिव साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक व समृद्धी ट्रॅक्टर्सचे अमर पाटील यांनी श्री गणरायाला घातले. यावेळी संचालक संतोष कांबळे, व्यवस्थापक केसकर, अशुतोषसिंग, सुरेंद्रर ठाकूर व सर्व कर्मचारी उपस्थित होते.
https://tinyurl.com/2l2msesf
dizayn cheloveka telegram
jcbe