सहकार शिरोमणी कारखान्याच्या आसवनी प्रकल्पात उत्पादन सुरु ,60 लाख बल्क लीटरचे उदिष्ट
पंढरपूर , दि.12– सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याछ सन 2020-21च्या गळीत हंगामात डिस्टिलरी प्रकल्पात उत्पादनाचा शुभारंभ मुंबई येथील युनिव्हर्सल इम्पोर्ट अॅण्ड एक्स्पोर्ट हॉस्पिटँलिटी कंपनीच्या एक्सपोर्ट मॕनेजर राखी लालजानी यांचे व पुणे येथील ग्लोबल अॅण्ड डोमेस्टिक कार्पोरशनच्या प्रोप्रायटर आरती डोंगरे यांच्या हस्ते फरमंटेशन टँकमध्ये कल्चर टाकून करण्यात आला.
प्रथम पाहुण्यांच्या हस्ते कारखान्याचे संस्थापक कै.वसंतदादा काळे व श्री विट्ठल रुक्मिणीच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. यावेळी कारखान्याचे अध्यक्ष कल्याणराव काळे यांनी कारखान्याच्या चालू हंगाम 2020-21 मध्ये कारखान्याचे दैनंदिन गाळप सुरळीत सुरु असून,सहवीज निर्मिती प्रकल्पातून वीज निर्यात करण्यात येत आहे. कारखान्यास वेळोवेळी सहकार्य केलेले एक्सपोर्ट राखी लालजानी आणि आरती डोंगरे यांच्या हस्ते आज डिस्टिलरी उत्पादनाचा शुभारंभ करण्यात आला आहे. प्रतीदिनी 3000 ब.ली.क्षमतेच्या प्रकल्पातून सिझनमध्ये आर.एस.इ.एन.ए.व एस.डी.एस.इ.उपपदार्थांचे सुमारे 60 लाख लीटर उत्पादनाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे एक्सपोर्ट मॕनेजर राखी लालजानी यांनी कारखान्यास आमचे नेहमीच सहकार्य राहणार असल्याचे सांगून कारखान्याचे गळीत हंगामास शुभेच्छा दिल्या.
यावेळी एक्सपोर्टर राखी लालजानी आणि आरती डोंगरे यांचा सत्कार सौ.संगिताताई काळे यांच्या हस्ते करण्यात आला.
याप्रसंगी कारखान्याचे अध्यक्ष कल्याणराव काळे, संचालिका श्रीमती.मालनबाई काळे, सौ.संगिताताई काळे,संचालक बाळासाहेब कौलगे,दिनकर चव्हाण, भारत कोळेकर,सुधाकर कवडे,राजाराम पाटील,युवराज दगडे,योगेश ताड,विलास जगदाळे,इब्राहिम मुजावर, नागेश फाटे,प्रदीप बागल,कार्यकारी संचालक प्रदीप रणवरे,डेप्यु.जनरल म्ॉनेजर के.आर.कदम,डिस्टलरी म्ॉनेजर पी.डी.घोगरे,चिफ इंजिनिअर एस.एन. औताडे ,प्रोडक्शन म्ॉनेजर एन.एम.कुंभार,डिस्टलरी इन्चार्ज एस.एस.बागल,आधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.