सीईटी परीक्षेचा फॉर्म भरण्याची आणखी एक संधी, आज आणि उद्या विद्यार्थी अर्ज करू शकणार

पंढरपूर: राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने नुकत्याच घेतलेल्या निर्णयानुसार शैक्षणिक वर्ष: २०२०-२१ मध्ये ऑनलाइन पध्दतीने घेण्यात येणाऱ्या सर्व अभ्यासक्रमांच्या सीईटी परीक्षांसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची संधी आज व उद्या, दि. ७ व ८ सप्टेंबर २०२० या दोन दिवसांसाठी देण्यात आलेली आहे.
ज्या विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी, फार्मसी इ. शिक्षणासाठी प्रवेश घ्यायचा आहे परंतु सीईटी अर्थात राज्य सामायिक प्रवेश परीक्षेचा फॉर्म अद्यापही भरलेला नाही किंवा आधी अर्धवट भरलेला होता अशा विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा. असे आवाहन स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे यांनी केले आहे. या राज्य सामायिक प्रवेश परीक्षेसंबंधी
अधिक माहितीसाठी www.mahacet.org या वेबसाईटला भेट द्यावी. तसेच प्रथम वर्ष अभियांत्रिकी प्रवेशासंदर्भात प्रा.उत्तम अनुसे (मोबाईल नंबर – ९१६८६५५३६५) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन केले आहे.

One thought on “सीईटी परीक्षेचा फॉर्म भरण्याची आणखी एक संधी, आज आणि उद्या विद्यार्थी अर्ज करू शकणार

  • March 17, 2023 at 4:48 am
    Permalink

    We’re a group of volunteers and starting a new scheme in our community. Your website offered us with valuable info to work on. You have done an impressive job and our entire community will be grateful to you.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!