सेवानिवृत्त होवून ही कोरोनाचे संकट दूर होईपर्यत विनामोबदला काम करत राहण्याचा भिकाजी मगर यांचा निश्चय

पंढरपूर- पंढरपूर नगरपरिषदेच्या बांधकाम विभागातील वरिष्ठ लिपिक भिकाजी मगर आज सेवानिवृत्त झाले. मात्र त्यांनी घरी विश्रांती न घेता कोरोनाचे संकट दूर होईपर्यत विनामोबदला पंढरपूरकरांची सेवा करणार असल्याचा मनोदय व्यक्त केला.

मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देवून मगर यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी बांधकाम विभागाचे प्रमुख नेताजी पवार, नगर रचनाकार केंद्रे, आरोग्य अधिकारी शरद वाघमारे, चिदानंद सर्वगोड, नवनाथ पवार आदी उपस्थित होते.
श्री मगर यांनी पंढरपूर नगरपरिषदेत 35 वर्षे बजावली. आरोग्य विभाग, घरपट्टी, पाणी पुरवठा आदीं ठिकाणी त्यांनी लक्षवेधक काम केले.
निवृत्ती निमित्त मुख्याधिकारी श्री मानोरकर यांनी मगर यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी मनोदय व्यक्त करताना श्री. मगर यांनी आज 31 मार्च ला सेवानिवृत्त होत असलो तरी घरी न बसता कोरोना संकट दूर होईपर्यत विनामोबदला पंढरपूरकरांच्या सेवेत राहणार असल्याचे स्पष्ट केले.

One thought on “सेवानिवृत्त होवून ही कोरोनाचे संकट दूर होईपर्यत विनामोबदला काम करत राहण्याचा भिकाजी मगर यांचा निश्चय

  • March 17, 2023 at 6:36 am
    Permalink

    After study a few of the blog posts on your website now, and I truly like your way of blogging. I bookmarked it to my bookmark website list and will be checking back soon. Pls check out my web site as well and let me know what you think.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!