सोमवारच्या अहवालानुसार सोलापूर जिल्हा ग्रामीणमध्ये 223 रुग्ण वाढले , 8 जणांनी प्राण गमावले

सोलापूर- सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात (महापालिकाक्षेत्र वगळून) सोमवार 12 आँक्टोबर रोजी एकूण 223 कोरोना रुग्ण वाढले आहेत. सर्वाधिक कोरोनाबाधित पंढरपूर तालुक्यात 58 आढळले आहेत. दरम्यान ग्रामीण भागात आज 244 जणांनी कोरोनावर मात केली आहे. सोमवारी जिल्हा ग्रामीणमध्ये 8 जणांनी कोरोनामुळे प्राण गमावले आहेत.कोरोनाचा प्रसार वेगाने होत असला तरी या आजारावर मात करून घरी परतणार्‍यांची संख्या ही दिवसेंदिवस वाढत आहे. दरम्यान ग्रामीण भागात कोरोनाबाधितांची एकूण संख्या 28026 इतकी झाली असून यापैकी 22813 जण कोरोनावर मात करून घरी गेले आहेत तर 4442 जणांवर उपचार सुरू आहेत. आज 244 जणांना घरी पाठविण्यात आले आहे. आजवर 771 जणांनी या आजारात प्राण गमावले आहेत.आजच्या अहवालानुसार 8 जण मयत आहेत.

पंढरपूर तालुक्यात 58 रूग्ण वाढले

पंढरपूर – सोमवार 12 आँक्टोबर रोजी आलेल्या जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या अहवालानुसार पंढरपूर शहर 30 व तालुक्यात ग्रामीणमध्ये 28 असे 58 कोरोनाबाधित रूग्ण वाढले आहेत.पंढरपूर शहर व तालुक्यात एकूण कोरोनाबाधितांची संख्या 5 हजार 514 झाली आहे. आजवर कोरोनामुळे प्राण गमावलेल्यांची एकूण संख्या 132 झाली आहे.एकूण 557 रूग्णांवर उपचार सुरू असून,आजवर 4825 जण कोरोना आजारातून बरे झाले आहेत .

One thought on “सोमवारच्या अहवालानुसार सोलापूर जिल्हा ग्रामीणमध्ये 223 रुग्ण वाढले , 8 जणांनी प्राण गमावले

  • March 17, 2023 at 2:14 am
    Permalink

    What’s Happening i am new to this, I stumbled upon this I’ve found It positively useful and it has helped me out loads. I hope to contribute & assist other users like its helped me. Great job.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!