सोलापूरहून नोकरीसाठी येणाऱ्या कर्मचाऱ्यांना ३० जूनपर्यंत पंढरपूरमध्येच राहणे बंधनकारक

पंढरपूर – पंढरपूर शहरातील सर्व बँका व इतर शासकीय कार्यालयातील सोलापूरहून येणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना 30 जून पर्यंत पंढरपूर शहरात रहाणे बंधनकारक करण्यात आले आहे.
पंढरपूर शहरा मध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव व संसर्ग रोखण्यासाठी व नियंत्रणासाठी आज पंढरपूर शहरातील सर्व बँक शाखा प्रमुख व इतर कार्यालय चे प्रमुखाची बैठक नगरपरिषद मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर, उपमुख्याधिकारी सुनील वाळूजकर, बँक कोऑर्डीनेटर योगेश काळे यांचे उपस्थितीत संपन्न झाली.
पंढरपूर शहरामध्ये असलेल्या सर्व बँकेमध्ये व इतर शासकीय कार्यालयात व इतर कार्यालयात बाहेरगावाहून विशेषतः सोलापूरहून काही कर्मचारी कामासाठी येत आहेत अशा तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. तसेच सध्या सोलापूरमध्ये कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शहरातील नागरिक अथवा बँकेत काम करणारे कर्मचार्‍यांना कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव व संसर्ग होऊ नये यासाठी काळजी घेणे आवश्यक आहे. याबाबत इंसिडेंट कमांडर तथा उपविभागीय अधिकारी सचिन ढोले यांनी शहरातील बँकांना नोटीस बजावण्याबाबत सूचना दिल्या होत्या. त्यानुसार नगरपरिषदने शहरातील सर्व बँकांना व इतर कार्यालयांना नोटिसा बजावल्या होत्या व आज सर्व बँकेचे शाखा प्रमुख व इतर शासकीय कार्यालयातील प्रमुखांची बैठक नगरपरिषद सभागृहात संपन्न झाली. या बैठकीमध्ये मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर यांनी बँकेत येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाची नोंद रजिस्टरला घ्यावी व त्यांचे थर्मल स्क्रीनिंग करण्यात यावे ,एखाद्या ग्राहकांला ताप असेल तर त्वरित नगरपरिषदेशी संपर्क साधावा तसेच सर्व बँकेचे शाखाप्रमुख इतर कार्यालय यांनी आपल्या बँकेत व कार्यालयात सोलापूरहून अथवा इतर गांवावरून किती कर्मचारी दररोज ये -जा करतात याची माहिती नगरपरिषदला त्वरित द्यावी , कार्यालयातील अथवा बँकेतील सर्व कर्मचाऱ्यांचे पल्स ऑक्सिमीटरद्वारे तपासणी करण्यात यावी, सर्व एटीएमचे वेळोवेळी सॅनिटायझिंग करण्यात यावे ,येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाचे हातावर सॅनिटायजझर मारूनच बँकेत प्रवेश द्यावा, कर्मचारी व ग्राहक यांनी मास्क वापरलाच पाहिजे तसेच सोशल डिस्टन्स राखला जाईल याची दक्षता घ्यावी. तसेच बाहेर गांवावरून येणारा कर्मचारी हा मुख्य कार्यालयाच्या ठिकाणी राहिला पाहिजे. तो कोणत्याही परिस्थितीत बाहेर गावी ये -जा करणार नाही याची दक्षता घेण्याची जबाबदारी सम्बधित कार्यालय प्रमुख यांची राहील. जर एखादा कर्मचारी सूचना देऊनही बाहेर गावी ये -जा करत असल्याचे निदर्शनास आल्यास किंवा त्याबाबत तक्रार आल्यास त्यांचेवर व कार्यालय प्रमुखावर आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मधील तरतुदीनुसार कायदेशीर कारवाई केली जाईल अशा प्रकारच्या सक्त सूचना या बैठकीत देण्यात आल्या .या बैठकीस शहरातील सर्व बँक शाखा प्रमुख व इतर कार्यलय प्रमुख हजर होते.

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!