सोलापूर जिल्हा ग्रामीणची आजची कोरोनाबाधित संख्या 291, पंढरपूर, माळशिरस व बार्शीत सर्वाधिक रूग्ण आढळले

पंढरपूर – सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात (महापालिकाक्षेत्र \nवगळून) कोरोनाचा प्रसार वेगाने होत असून शुक्रवार 7 ऑगस्ट रोजी सकाळी आलेल्या अहवालानुसार अकरा तालुक्यांमध्ये 291 रूग्ण वाढले आहेत तर 8 जणांचा मृत्यू झाला आहे. आज सर्वाधिक कोरोनाबाधित पंढरपूर शहर व तालुक्यात 67, यापाठोपाठ माळशिरस तालुका 66 तर बार्शीत 62 आढळले आहेत.
जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 4 हजार 875 इतकी असून आजवर 144 जणांना या आजाराने प्राण गमवावे लागले आहेत. सध्या 1 हजार 786 जणांवर उपचार सुरू असून 2945 जण उपचारानंतर घरी गेले आहेत. सोलापूर जिल्ह्यातील मोठी शहर म्हणून बार्शी व पंढरपूरकडे पाहिले जाते. बार्शीत एकूण रूग्णसंख्या ही 1038 इतकी झाली आहे. तेथील 703 रूग्ण बरे झाले असून 291 जणांवर उपचार सुरू आहेत. तर पंढरपूरमध्ये रूग्णसंख्या ही 751 झाली असून 410 जण बरे झाले आहेत तर 320 जण अद्याप उपचार घेत आहेत. माळशिरस तालुक्यात 359 एकूण रूग्ण असून 137 उपचारानंतर घरी गेले आहेत तर 217 जण रूग्णालयात उपचार घेत आहेत.
शुक्रवारच्या अहवालानुसार 8 जणांनी कोरोनामुळे प्राण गमावले असून यात बार्शी 5, माळशिस 2 व मंगळवेढा तालुक्यातील एका रूग्णाचा समावेश आहे. जिल्ह्यात आजवर 36 हजार 409 जणांची कोविड तपासणी करण्यात आली असून 36 हजार 272 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 137 प्रलंबित असून 31 हजार 398 निगेटिव्ह आहेत तर 4874 पॉझिटिव्ह आहेत. शुक्रवार 7 ऑगस्ट रोजी 3082 अहवाल मिळाले असून यापैकी 2 हजार 791 निगेटिव्ह तर 291 पॉझिटिव्ह आहेत. यात 163 पुरूष तर 128 स्त्रियांचा समावेश आहे. आज एकूण 163 जणांना घरी उपचारानंतर पाठविण्यात आले.
आज तालुकानिहाय पॉझिटिव्ह सापडलेले रूग्ण पुढीलप्रमाणे व कंसात आजवरचे एकूण रूग्ण – अक्कलकोट 10(537), बार्शी 62 (1038), करमाळा 15 (201), माढा 9 (356), माळशिरस 66 (359), मंगळवेढा 17 (176), मोहोळ 8(319), उत्तर सोलापूर 21 (349), पंढरपूर 67 (751), सांगोला 4 (141) तर दक्षिण सोलापूर 12 (648).
WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!