सोलापूर जिल्हा ग्रामीणमध्ये 37 रूग्ण वाढले, एकूण संख्या 710

पंढरपूर – सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात ( सोलापूर महापालिका क्षेत्र वगळून) शुक्रवार 10 जुलै रोजी आणखी 37 कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले आहेत. आता एकूण बाधितांची संख्या ही 710 इतकी झाली आहे. आज दोन जणांना कोरोनामुळे प्राण गमवावे लागले आहेत.
मंगळवारी 285 जणांचे अहवाल प्राप्त झाले असून यापैकी 245 निगेटिव्ह आले तर 37 जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. अद्याप 68 जणांचे स्वॅब तपासणीचे अहवाल प्रलंबित आहेत. आजपर्यंत ग्रामीण भागात 32 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झालेला आहे.
शुक्रवारी जे 37 रूग्ण आढळून आले आहेत ते तालुका निहाय पुढीलप्रमाणे- उत्तर सोलापूर तालुका 10, अक्कलकोट तालुका 12, पंढरपूर तालुका 6, माळशिरस तालुका 1, मोहोळ तालुका 3, बार्शी तालुका 4, मंगळवेढा 1.

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!