सोलापूर जिल्हा ग्रामीणमध्ये रविवारी 134 रुग्णांची भर ,198 जण झाले कोरोनामुक्त

सोलापूर– सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात (महापालिकाक्षेत्र वगळून) रविवारी 1 नोव्हेंबर रोजी एकूण 134 कोरोना रुग्ण वाढले आहेत. सर्वाधिक कोरोनाबाधित पंढरपूर तालुक्यात 36 आढळले आहेत. दरम्यान ग्रामीण भागात आज 198 जणांनी कोरोनावर मात केली आहे. रविवारच्या अहवालानुसार जिल्हा ग्रामीणमध्ये 5 जणांनी कोरोनामुळे प्राण गमावले आहेत. कोरोनाबाधित रूग्णांची आता संख्या कमी होताना दिसून या आजाराव़र मात करून घरी परतणार्‍यांची संख्याच वाढली आहे. जिल्हा ग्रामीण भागात कोरोनाबाधितांची एकूण संख्या 31155 इतकी झाली असून यापैकी 28521 जण कोरोनावर मात करून घरी गेले आहेत तर 1712 जणांवर उपचार सुरू आहेत. आज 198 जणांना घरी पाठविण्यात आले आहे. आजवर 922 जणांनी या आजारात प्राण गमावले आहेत.आजच्या अहवालानुसार 5 जण मयत आहेत.

पंढरपूर तालुक्यात 36 रूग्ण वाढले

पंढरपूर- रविवारी 1 नोव्हेंबर रोजी आलेल्या जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या अहवालानुसार पंढरपूर शहर 8 व तालुक्यात ग्रामीणमध्ये 28 असे 36 कोरोनाबाधित रूग्ण वाढले आहेत.पंढरपूर शहर व तालुक्यात एकूण कोरोनाबाधितांची संख्या 6 हजार 177 झाली आहे. आजच्या अहवालानुसार 3 जण कोरोनामुळे मरण पावले आहेत. आजवर कोरोनामुळे प्राण गमावलेल्यांची एकूण संख्या 183 झाली आहे.एकूण 454 रूग्णांवर उपचार सुरू असून,आजवर 5540 जण कोरोना आजारातून बरे झाले आहेत .

One thought on “सोलापूर जिल्हा ग्रामीणमध्ये रविवारी 134 रुग्णांची भर ,198 जण झाले कोरोनामुक्त

  • March 17, 2023 at 6:58 am
    Permalink

    I love the efforts you have put in this, regards for all the great content.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!