सोलापूर जिल्हा ग्रामीणमध्ये कडक निर्बंध कायम , सकाळी ७ ते ११ अत्यावश्यक सेवेतील दुकाने सुरु राहणार

सोलापूर : सोलापूर जिल्हा ग्रामीणमधील रुग्णसंख्या अजूनही कमी झालेली नसून मृत्यूदरही जास्त आहे. या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यात अत्यावश्‍यक सेवा वगळता अन्य कोणतीही दुकाने १ जून पासून उघडण्यास परवानगी न देण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी यांनी घेतला. 15 जूननंतरची स्थिती पाहून अन्य दुकानांबाबत निर्णय घेतला जाईल.

ही दुकाने सुरू राहणार…
*किराणा दुकाने, भाजीपाला, डेअरी, बेकरीसह अन्य खाद्यपदार्थ दुकान : सकाळी सात ते सकाळी अकरापर्यंत
*पार्सल व घरपोच सेवेसाठी खाद्यपदार्थ विक्रेत्यांना सकाळी सात ते रात्री आठपर्यंत मुदत
*हॉटेल, बार, रेस्टॉरंट राहणार बंदच राहणार मात्र होम डिलिव्हरी व पार्सल सेवेला परवानगी
सार्वजनिक वाहतूक, टॅक्‍सी, बससेवा सुरू होईल; पण प्रवाशांची मर्यादा पूर्वीप्रमाणेच पाळावी लागणार
विवाहासाठी 25 व्यक्‍तींची मर्यादा; विवाह समारंभातील कर्मचाऱ्यांकडे कोरोना चाचणीचा रिपोर्ट बंधनकारक
परीक्षांना सवलती, 12 वी परीक्षेसाठी सवलत मात्र परीक्षेसंबंधित सर्वांना कोरोनाची चाचणी करण्याची
हे बंद असणार ..
शहर-जिल्ह्यातील सलून दुकाने उघडण्यास परवानगी नाहीच.
मंदिरे, धार्मिक स्थळांना परवानगी नाहीच; नियम पाळून नित्यपूजा करता येईल.
सिनेमागृहे, नाट्यगृहे व मनोरंजनाच्या कोणत्याही सेवा सुरू राहणार नाही.
अत्यावश्‍यक सेवेतील दुकाने वगळता अन्य कोणत्याही दुकानांना परवानगी नाही
शेतकऱ्यांना दिलासा
शेतीशी निगडित सेवा आणि कृषी उत्पादनाविषयक सर्व सेवा सुरळीत राहण्यासाठी बियाणे, खते, कृषी अवजारे, त्याची दुरुस्ती या दुकानांना सकाळी सात ते दुपारी दोन वाजेपर्यंत उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे.
WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!