सोलापूर जिल्हा ग्रामीणमध्ये 40 नवे रूग्ण, पंढरपूरमधील 5 जणांचा समावेश

पंढरपूर – सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात ( सोलापूर महापालिका क्षेत्र वगळून) मंगळवारी 1 जुलै रोजी आणखी 40कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले आहेत. आता एकूण बाधितांची संख्या ही 400 इतकी झाली आहे. दरम्यान आषाढी एकादशी दिवशी पंढरपूरमध्ये पाच कोरोनाबाधित आढळून आले असून यातील दोनजण मुळचे मुंबईचे आहेत.
बुधवारी एकूण 229 जणांचे अहवाल प्राप्त झाले असून यापैकी 189 निगेटिव्ह आले तर 40 जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. अद्याप 48 जणांचे स्वॅब तपासणीचे अहवाल प्रलंबित आहेत. सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात (सोलापूर महानगरपालिका क्षेत्र वगळून) 4050 जणांचे स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आले होते यापैकी 4002 जणांची अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण पॉझिटिव्ह अहवाल 400 आहेत तर 3602 अहवाल निगेटिव्ह आहेत. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात आजपर्यंत कोरोनामुळे 18 जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.
बुधवारी जे 40 नवीन कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले आहेत पंढरपूर तालुक्यातील 5, मोहोळ तालुका 2, अक्कलकोट तालुका 7 तर उत्तर सोलापूर तालुक्यातील 17, दक्षिण सोलापूर तालुक्यातील 9 जणांचा समावेश आहे.
ऐन आषाढी एकादशी दिवशी सकाळी पंढरपूरमध्ये 5 कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले आहेत. यामुळे आजवर येथील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 21 झाली आहे. मध्यंतरी पंढरी कोरोनामुक्त झाली होती आता ही संख्या वाढू लागली आहे. पंढरपूर शहरातील तालुका पोलीस स्टेशनच्या पाठीमागे 1, गजानन नगर 1, शेगावदुमाला 1 तर मुळचे मुंबईचे परंतु सध्या पंढरीत आलेले दोनजण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.
आज उत्तर सोलापूर तालुक्यातील मार्डी 15, बाणेगाव येथे 2 रूग्ण आढळून आले आहेत. तर मोहोळमधील मेहबूबनगर 1, आष्टे येथे 1 जण कोरोनाबाधित आढळून आला आहे. अक्कलकोट तालुक्यातील किस्तके मळा 2, माणिकपेठ 4, बुधवार पेठ 1 रूग्ण आढळून आले आहेत. दक्षिण सोलापूर तुलक्यातील बक्षिहिप्परगा येथै 1, नवीन विडी घरकुल 5, होटगी स्टेशन 1, लिंबीचिंचोळी 1, कुुंभारी 1 असे कोरोनाबाधित आढळून आले आहेत.
जिल्ह्यात एकूण 401 रूग्ण आजवर आढळून आले असून यापैकी 229 जणांवर उपचार सुरू आहेत तर 154 जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. ग्रामीणमधील मृतांचा एकूण आकडा 18 इतका आहे.
WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!