सोलापूर जिल्हा ट्रॅक्टर डिलर असोसिएशनच्या अध्यक्षपदी अभिजीत पाटील यांची निवड

पंढरपूर, दि.5 – सोलापूर जिल्ह्यातील सर्व ट्रॅक्टर कंपन्यांच्या डिलर असोसिएशनची रविवारी बार्शी येथे बैठक पार पडली. यावेळी सोलापूर जिल्ह्यातील सर्व डिलरच्या वतीने पंढरपूरचे उद्योजक अभिजित पाटील यांची जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली.
कोरोनाचे संकट देशासह महाराष्ट्रात असल्याने आर्थिक संकटात सापडलेल्या सर्व डिलरच्या अडीअडचणी व प्रश्‍न मार्गी लावण्यावर भर दिला जाईल. तसेच आरटीओच्या नियमाचे पालन करून ट्रॅक्टर विक्री करण्यात येईल. शेतकर्‍यांच्या हिताचे काम करण्याचा आपला हेतू असेल, शेतकर्‍यांना जास्तीत जास्त कसा फायदा होईल, माझा शेतकरी समृद्ध होईल याचा विचार केला जाईल असे अभिजित पाटील या निवडीनंतर बोलताना म्हणाले.
यावेळी उपाध्यक्ष किरण रणशिंग,अजित मिरगणे,नागेश बोबडे, सचिव शिवशंकर पाटील यांची निवड करण्यात आली.

यावेळी सोलापूर जिल्ह्यातील डिलर्स संतोष ठोंबरे, प्रवीण कसपटे, सतीश जाजू ,विनोद कोरटकर, गणेश तोंडले,विठ्ठल कोळवले,संजय पारसवार,अजय राजानी,औदुंबर देशमुख,बी. एस. शुक्ला,अविनाश बागमार,अक्षय गुंड ,राहुल कोंढारे,संजय मेटकरी, रामभाऊ रांखुडे आदी उपस्थित होते.

871 thoughts on “सोलापूर जिल्हा ट्रॅक्टर डिलर असोसिएशनच्या अध्यक्षपदी अभिजीत पाटील यांची निवड