सोलापूर जिल्ह्यात 21 हजार 667 रूग्ण संख्या, 15,591 कोरोनामुक्त तर 5,226 जणांवर उपचार सुरू

पंढरपूर – जिल्ह्यात सोलापूर शहरासह ग्रामीण भागात एकूण कोरोनाबाधितांची संख्या 21 हजार 667 इतकी झाली आहे. शहरात 8 सप्टेंबरपर्यंत 7145 तर ग्रामीण भागात 14522 रूग्ण आढळून आले आहेत. सध्या 5226 रूग्ण उपचार घेत असून जिल्ह्यात कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या 15591 इतकी आहे. कोरोनामुळे आजवर एकूण मृतांचा आकडा हा 850 इतका आहे.
सोलापूर शहरातील कोरोनाबाधितांची संख्या कमी होत असून सध्या तेथे 806 रूग्ण उपचार घेत आहेत तर 5908 जण कोरोनावर मात करून घरी गेले आहेत. शहरात 431 जणांनी आपले प्राण कोरोना आजारात गमावले आहेत. मंगळवारी 8 सप्टेंबरच्या अहवालानुसार शहरात 66 रूग्ण नव्याने आढळून आले आहेत. सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून मंगळवारी 337 रूग्ण नव्याने सापडले आहेत. ग्रामीण भागात कोरोनाबाधितांची एकूण संख्या 14 हजार 522 इतकी झाली असून यापैकी 9683 जण कोरोनावर मात करून घरी गेले आहेत तर 4420 जणांवर उपचार सुरू आहेत. आजवर 419 जणांनी या आजारात प्राण गमावले आहेत.
सोलापूर शहरात जेंव्हा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत होता तेंव्हा शेजारच्या दक्षिण व उत्तर सोलापूर तालुक्यासह अक्कलकोटमध्ये रूग्ण जास्त सापडत होते मात्र आता तेथील परिस्थिती सुधारत असून रूग्ण संख्या कमालीची घटली आहे. मात्र अन्य तालुक्यांमध्ये कोरोनाचा आकडा वाढत असल्याचे चित्र आहे. पंढरपूर, बार्शी, माळशिरस, माढा, दक्षिण सोलापूर या तालुक्यांची एकूण रूग्ण संख्या चार आकडी आहे. (म्हणजेच एक हजाराहून अधिक रूग्ण येथे आढळले आहेत.) जिल्ह्यात सर्वाधिक रूग्ण पंढरपूर तालुक्यात 3217 आहेत. तर सर्वाधिक मृत्यू हे बार्शी तालुक्यात 106 इतके झाले आहेत. पंढरपूर तालुक्यात 67 जणांनी या आजारात आपले प्राण गमावले आहेत.
दरम्यान जिल्ह्यात शहरी भागात कोरोनाचे 5245 तर ग्रामीण भागात 9277 रूग्ण आढळून आले आहेत. शहरी भागात सर्वाधिक रूग्ण पंढरपूरमध्ये 1785 आढळून आले आहेत. यापाठोपाठ बार्शीत 1726 इतका आकडा आहे.
मंगळवारच्या अहवालानुसार आजवर तालुकानिहाय पॉझिटिव्ह सापडलेलेे रूग्ण पुढीलप्रमाणे – अक्कलकोट 737, बार्शी 2759, करमाळा 916, माढा 1303 , माळशिरस 1861, मंगळवेढा 597, मोहोळ 693, उत्तर सोलापूर 563, पंढरपूर 3217, सांगोला 787, तर दक्षिण सोलापूर 1089.

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!