सोलापूर विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा पूर्ण, 31 ऑक्टोंबरपर्यंत निकाल
99.86 टक्के विद्यार्थ्यांनी दिली ऑनलाइन परीक्षा
सोलापूर, दि. 21- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या अंतिम सत्राच्या सर्व परीक्षा यशस्वीरित्या पूर्ण झाल्या आहेत. यामध्ये 99.86% विद्यार्थ्यांनी ऑनलाइन परीक्षा दिली तर 0.14 टक्के विद्यार्थ्यांनी ऑफलाइन परीक्षा दिली. केवळ 133 विद्यार्थ्यांनी ऑफलाईन परीक्षा दिली आहे, अशी माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक श्रेणीक शहा यांनी दिली.
कोरोना महामारीमुळे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाकडून उन्हाळी 2020 अंतिम वर्ष आणि एटीकेटी तसेच बॅकलॉग विद्यार्थ्यांच्या परीक्षा ऑनलाईन आणि ऑफलाईन घेण्यात आल्या. या परीक्षेसाठी एकूण 99 हजार 970 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. 5 ऑक्टोबरपासून सुरुवातीला एटीकेटी आणि बॅकलॉग विद्यार्थ्यांच्या परीक्षेला सुरुवात झाली. त्यानंतर 12 ऑक्टोबरपासून अंतिम वर्षाच्या नियमित विद्यार्थ्यांच्या परीक्षेला सुरुवात झाली. या विद्यार्थ्यांच्या सर्व अभ्यासक्रमांच्या परीक्षा पूर्ण झाल्या आहेत. एटी-केटी व बॅकलॉग विद्यार्थ्यांच्या काही राहिलेल्या परीक्षा लवकरच पूर्ण होतील. नियमित विद्यार्थ्यांबरोबरच एटी-केटी व बॅकलॉग विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेणारे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ हे महाराष्ट्रामध्ये एकमेव विद्यापीठ आहे.
प्रथम आणि द्वितीय वर्षाच्या एटीकेटी आणि बॅकलॉग विद्यार्थ्यांच्या परीक्षा 1 ते 6 नोव्हेंबर या कालावधीत होतील. विविध कारणांमुळे पाच टक्के विद्यार्थी परीक्षा देऊ शकले नाहीत, अशा विद्यार्थ्यांनी विद्यापीठास विनंती केल्यास त्यांच्या परीक्षा नोव्हेंबरमध्ये घेण्यात येतील, असे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक श्रेणीक शहा यांनी दिली.
*31 ऑक्टोबरपर्यंत निकाल*
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्यात आल्या. अंतिम वर्षाच्या नियमित विद्यार्थ्यांच्या सर्व परीक्षा पूर्ण झाल्या आहेत. 31 ऑक्टोंबर 2020 पर्यंत झालेल्या परीक्षांचे निकाल जाहीर करण्यात येईल. विद्यार्थ्यांना ऑनलाईन निकाल मिळेल.
-डॉ. मृणालिनी फडणवीस, कुलगुरू
*5 रोजीची परीक्षा 24 ला होणार*
तांत्रिक अडचणीमुळे 5 ऑक्टोंबर 2020 रोजी काही विद्यार्थ्यांची एटीकेटी आणि बॅकलॉगची परीक्षा झाली नाही. त्यामुळे काही विद्यार्थ्यांना त्यादिवशी परीक्षा देता आले नाही. तसेच ज्या विद्यार्थ्यांची त्यादिवशी परीक्षा वेळेत पूर्ण झाली नाही, अशा विद्यार्थ्यांची परीक्षा 24 ऑक्टोंबर 2020 रोजी सकाळी दहा ते दुपारी तीन यावेळेत होणार आहे. ज्या विद्यार्थ्यांची यशस्वीरीत्या परीक्षा पूर्ण झाली आहे, त्या विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा देण्याची गरज नाही. यशस्वीरित्या परीक्षा झालेल्या विद्यार्थ्यांचे लॉगीन होणार नाही, याची नोंद घ्यावी, असे आवाहन विद्यापीठ प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
Wohh exactly what I was looking for, thanks for posting.
Perfectly composed subject material, Really enjoyed reading.
I and my friends appeared to be reviewing the good secrets located on your web site then quickly came up with a terrible feeling I had not expressed respect to the site owner for those secrets. The guys are already for that reason excited to study all of them and have in effect actually been making the most of those things. I appreciate you for indeed being indeed considerate as well as for going for variety of perfect areas millions of individuals are really needing to learn about. Our honest apologies for not expressing appreciation to you sooner.
I?¦ve recently started a site, the information you provide on this site has helped me greatly. Thanks for all of your time & work.
Hmm is anyone else having problems with the images on this blog loading? I’m trying to figure out if its a problem on my end or if it’s the blog. Any feed-back would be greatly appreciated.
I think this internet site holds some very great information for everyone :D. “Experience is not what happens to you it’s what you do with what happens to you.” by Aldous Huxley.
I am glad to be a visitor of this stark web site! , appreciate it for this rare info ! .
Aw, this was a very nice post. In idea I wish to put in writing like this additionally – taking time and precise effort to make an excellent article… but what can I say… I procrastinate alot and under no circumstances seem to get something done.
I like this weblog so much, saved to fav.
It¦s really a nice and useful piece of information. I¦m satisfied that you simply shared this helpful information with us. Please stay us informed like this. Thanks for sharing.