सोलापूर शहरात आज नवे 43 रूग्ण, तर 189 जण उपचारानंतर घरी गेले

सोलापूर– शहरात शुक्रवार 7 ऑगस्टच्या अहवालानुसार नवे 43 रूग्ण आढळून आले आहेत. येथील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 5 हजार 334 इतकी झाली आहे. दरम्यान आज कोरोनामुळे 4 जणांना प्राण गमवावे लागले आहेत. आज 189 जणांना उपचारानंतर घरी पाठविण्यात आले आहे.

सोलापूर महापालिकाक्षेत्रात आजवर 5 हजार 334 रूग्ण आढळून आले असून यापैकी 374 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या उपचार सुरू असणारे 1 हजार 231 रूग्ण असून 3 हजार 730 जण उपचारानंतर घरी परतले आहे.
गुरूवारच्या अहवालानुसार आज एकूण 684 अहवाल मिळाले असून यापैकी 641 निगेटिव्ह आहे तर 43 पॉझिटिव्ह आहेत. आज 189 जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे.

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!