पंढरपूर – कोरोना मुक्त गाव ही चळवळ झाली पाहिजे. उपचारापेक्षा होऊ नये म्हणून काळजी घ्या. सोलापूर जिल्हयात २० हजार झांडाचे संगोपन करणार आहेत. चिंचणी गाव झाडामुळे ऑक्सिजन पार्क बनले आहे असे मत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी व्यक्त केले.
पंढरपूर तालुक्यांतील पर्यावरण युक्त चिंचणी येथे प्रीसिजन कामशाफ्ट च्या वतीने पाणी पुरवठा विहीरीसाठी व स्मशानभूमी परिसरांत सोलार संच बसविणेत आला आहे. या प्रकल्पाचे लोकार्पण सिईओ दिलीप स्वामी व पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते व प्रीसिजन च्या विश्वस्त सुहासिनी यतीन शहा यांचे हस्ते करणेत आले.
माझे गाव कोरोनामुक्त गाव अभियान अंतर्गत कोरोना मुक्त गाव चिंचणीस आज मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी भेट देऊन मार्गदर्शन केले. या प्रसंगी पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते, प्रीसिजन समूहाच्या सुहासिनी शहा, गटविकास अधिकारी रविकिरण घोडके, , कार्यकारी अभियंता सुनील कटकधोंड, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव, उपअभियंता पांडव , तालुका वैद्यकीय अधिकारी डाॅ. एकनाथ बोधले, सरपंच मुमताज शेख, प्रीसिजन चे जनसंपर्क अधिकारी माधव देशपांडे, संयोजक मोहन अनपट उपस्थित होते .
यावेळी बोलताना मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी म्हणाले, सोलापूर जिल्हयात ‘माझे गाव कोरोना मुक्त, हे अभियान सुरू केले. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी या मोहिमेचा गौरव केला. कोरोनाची पहिली लाट संपत आली असताना हे अभियान सुरू केले. सुरूवातीला या अभियाना बाबत प्रश्न उपस्थित केले. नंतर दुसरी लाट आल्यानंतर अभियानाचे महत्व कळले. २०० पेक्षा अधिक गावांनी कोरोनाला रोखले. उपचारापेक्षा होऊ नसे याची काळजी घेतली. चिंचणी गावाने कोरोनावर मात केली असताना झाडे लावून व त्याचे संगोपन करून त्यांनी ऑक्सिजन पार्क तयार केला आहे. चिंचणीचा आदर्श घेणे सारखा आहे. आम्ही २० हजार कर्मचारी झाडांचे लागवड व संगोपन करणार आहोत. या मोहिमेचा नियोजन करणेत आले आहे. केवळ फोटो पुरते वृक्षारोपण नाही तर त्याचे जतन व संवर्धन करणेत येणार आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व संत गाडगे बाबा यांचे कल्पनेतील चिंचणी गाव राज्यास आदर्श दायी आहे. केंद्र शासनाने चिंचणींची दखल घेतली. असेही श्री स्वामी यांनी सांगितले.
या प्रसंगी बोलताना जिल्हा ग्रामीण पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते म्हणाल्या , सातारा सारख्या जिल्ह्यातून पुनर्वसन झालेल्या चिंचणीकरांच्या कार्यास सलाम केला पाहिजे. लोकसहभागातून उभारलेले प्रति महाबळेश्वर प्रेरणादायी आहे. मेढा ते माढा हा संघर्षमय प्रवास दिशा देणारा आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी स्वामी यांनी सुरू केलेली माझ गाव कोरोना मुक्त गाव हे अभियान प्रत्यक्षात साकार केले. कोरोना ला गावाच्या बाहेर ठेवण्याचे काम ग्रामस्थांनी केले आहे.
प्रीसिजन च्या विश्वस्त सुहासिनी शहा म्हणाल्या, ग्रामस्थांनी एकजुटीने केलेले कार्य पाहून सोलार युनिट देणेचा निर्णय आम्ही घेतला. इस्त्राईल च्या धर्तीवर ग्रामस्थांनी सामुहिक शेती करावी. क्लीन व ग्रीन चिंचणी ची यशोगाथा प्रेरणादायी आहे. ग्रामस्थांनी कोरोना नियंमांचे पालन करून स्वागत केले. सुरूवातीला वृक्षारोपण मान्यवरांचे हस्ते करणेत आले.