पंढरपूर तालुका : रविवारी 35 कोरोना रुग्ण वाढले
पंढरपूर – रविवारी 30 आँगस्ट रोजी आलेल्या जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या अहवालानुसार पंढरपूर शहर 21 व तालुक्यात 14 असे 35 कोरोनाबाधित रूग्ण वाढले आहेत.
पंढरपूर शहर व तालुक्यात एकूण कोरोनाबाधितांची संख्या 2 हजार 472 झाली आहे. आजवर कोरोनामुळे प्राण गमावल्यांची एकूण संख्या 50 आहे.
एकूण 702 रूग्णांवर उपचार सुरू असून,आजवर 1720 जण कोरोना मधून बरे झाले आहेत .