शिवसेनेचे आमदार मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी देणार एका महिन्याचे वेतन
*शिवसेना विधिमंडळ गटनेते एकनाथ शिंदे यांनी घेतली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट*
मुंबई, दि. 27– कोरोना विषाणु प्रादूर्भाव रोखण्यासाठी राज्य शासन शर्थीचे प्रयत्न करत आहे. मात्र, या संकटामुळे आर्थिक समस्या उद्भवण्याची भीती वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे या राज्य शासनासोबत काम करण्यासाठी शिवेसनेचे आमदार आपले एक महिन्याचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीला सुपूर्द करणार असल्याची माहिती शिवसेना पक्षाचे विधिमंडळ नेते एकनाथ शिंदे यांनी दिली.
कोरोनाच्या संकटात मात करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार सुनियोजित पद्धतीने उपाययोजना करत आहे. तुम्ही खबरदारी घ्या, मी जबाबदारी घेतो, अशी भूमिका घेत मुख्यमंत्री राज्यातील जनतेला सर्वोतोपरीने आधार देत आहेत. या लढाईत आपला देखील खारीचा वाटा असावा म्हणून शिवसेनेचे सर्व आमदार, आपले एक महिन्याचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी देणार आहेत.राज्यातील गोरगरीब जनतेला या निधीचा निश्चित फायदा होईल, असा आशावाद एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे.
*दरम्यान, काल 26 मार्च रोजी राज्याचे नगरविकास व सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी सामाजिक बांधिलकी म्हणून स्वतःहुन आपले 1 महिन्याचे विधानसभा सद्स्य म्हणून मिळणारे मानधन मुख्यमंत्री सहाय्यता निधीला सुपूर्द करण्याचा निर्णय घेतला होता.*