शेतकऱ्यांच्या मदतीला धावून आले धाराशिव कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील
नांदेड – धाराशिव साखर कारखाना युनिट३ शिवणी जा. लोहा येथील डोंगरगाव {ता.लोहा} येथील ११ शेतकऱ्यांच्या ३५ एकर लागवड असलेला उसाला शॉर्टसर्किटमुळे आग लागली. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले होते, वर्षभराची मेहनत आणि येणाऱ्या वर्षातली स्वप्न त्यांच्या डोळ्यासमोर जळत होते. आग लागल्यावर त्यांनी इतर कारखान्यावर संपर्क केला पण कोणीही दखल घेतली नाही. शेतकऱ्यांनी अभिजित पाटील यांच्याशी संपर्क केल्यास त्यांनी वेळेचे गांभीर्य लक्षात घेऊन, तत्काळ जनरल मॅनेजर व शेती विभाग यांना सूचना दिल्या तसेच तातडीने ऊसाची तोड करण्यासाठी ७ ते ८ टोळ्या पाठवल्या व अवघ्या ३ ते ४ दिवसामध्ये जळीत ऊस गाळपास आणला.
याआधी डोंगरगाव परिसराच्या जवळपास कारखाना नसल्यामुळे मुबलक पाणी असूनही कुणी उसाचे उत्पन्न घेत नसे आणि अपवादाने कुणी घेतलेच तर ऊस बाहेरच्या कारखान्यावर द्यावा लागत असे. त्यामुळे शेतकऱ्यांची गैरसोय होई आणि हातात उत्पन्न ही कमी येत असे. त्यामुळे उसाची लागवड केल्या जात नसे. पण धाराशिव साखर कारखान्याचे चेअरमन श्री.पाटील यांच्या प्रयत्नातून डोंगरगावच्या परिसरात कारखाना सुरु झाल्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात उसाचे उत्पन्न घेऊ लागले. साहजिकच यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारत आहे. श्री.पाटील यांच्या समय सूचकतेमुळे आणि संवेदनशीलतेमुळे शेतकऱ्यांचे होणारे लाखो रुपयाचे नुकसान टळले. या भावनेतुन शेतकऱ्यांनी श्री.पाटील यांची भेट घेऊन धन्यवाद दिले. श्री.पाटील यांनी “आपण जे केले ते आपले कर्तव्यच होते.” असे म्हणून शेतकऱ्यांचे आदरपूर्वक आभार श्री. अभिजीत पाटील यांनी मानले.
या भेटी प्रसंगी अखिल भारतीय पोलीस हक्क संरक्षक संघटना महाराष्ट्राचे अध्यक्ष श्री. खंडेराव नागनाथ जाधव, धाराशिव साखर कारखान्याचे संचालक श्री.भागवत चौगुले, श्री.सुहास शिंदे, जनरल मॅनेजर श्री. ढाके, शेतीविभाग अधिकारी श्री. शिंदे, श्री.चंद्रशेखर दिगांबर जाधव, श्री.राघोबा उत्तमराव जाधव, सौ.पुष्पाबाई प्रकाश जाधव, श्री.माधव धोंडिबा जाधव, श्री.उमाकांत आत्माराम जाधव, श्री.सूर्यकांत संभाप्पा मुंदाळे, श्री.संतोष जामगे व ऊस उत्पादक संघाचे सदस्य तसेच डोंगरगावचे ग्रामस्थ उपस्थित होते.