सोलापूर शहरात गुरूवारी 58 रूग्ण वाढले तर 147 जण कोरोनामुक्त
सोलापूर – सोलापूर शहरात गुरूवार 3 सप्टेंबरच्या अहवालानुसार 58 कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. येथील एकूण रुग्णसंख्या आता 6815 इतकी झाली आहे. आज 1041 अहवाल प्राप्त असून यापैकी 983 निगेटिव्ह तर 58 पॉझिटिव्ह आहेत. प्रलंबित अहवाल 188 असून आज 3 मृत्यूंची नोंद आहे. आजतागायत कोरोनामुळे 423 मृत्यू शहरात झाले आहेत.गुरुवारी कोरोनामुक्त झालेल्या 147 जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून आजपर्यंत कोरोनावर मात करून 5723 जण घरी गेले आहेत.सध्या669 कोरोनाबाधितांवर उपचार सुरु आहेत.