शनिवारी सोलापूर जिल्हा ग्रामीणमध्ये 101 रूग्ण वाढले तर 240 जण झाले कोरोनामुक्त
सोलापूर– सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात (महापालिकाक्षेत्र वगळून) शनिवार 17 ऑक्टोंबर रोजी एकूण 101 कोरोना रुग्ण वाढले आहेत. सर्वाधिक कोरोनाबाधित माळशिरस तालुक्यात 23 आढळले आहेत. दरम्यान ग्रामीण भागात आज 240 जणांनी कोरोनावर मात केली आहे. शनिवारी जिल्हा ग्रामीणमध्ये 10 जणांनी कोरोनामुळे प्राण गमावले आहेत. कोरोनाबाधित रूग्णांची आता संख्या कमी होताना दिसून या आजाराव़र मात करून घरी परतणार्यांची संख्याच वाढली आहे. जिल्हा ग्रामीण भागात कोरोनाबाधितांची एकूण संख्या 28803 इतकी झाली असून यापैकी 24169 जण कोरोनावर मात करून घरी गेले आहेत तर 3821 जणांवर उपचार सुरू आहेत. आज 240 जणांना घरी पाठविण्यात आले आहे. आजवर 813 जणांनी या आजारात प्राण गमावले आहेत.आजच्या अहवालानुसार 10 जण मयत आहेत.
पंढरपूर तालुक्यात 22 रूग्ण वाढले
पंढरपूर- शनिवार 17 ऑक्टोंबर रोजी आलेल्या जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या अहवालानुसार पंढरपूर शहर 8 व तालुक्यात ग्रामीणमध्ये 14 असे 22 कोरोनाबाधित रूग्ण वाढले आहेत.पंढरपूर शहर व तालुक्यात एकूण कोरोनाबाधितांची संख्या 5 हजार 698 झाली आहे. आजच्या अहवालानुसार 2 जण कोरोनामुळे मरण पावले आहेत. आजवर कोरोनामुळे प्राण गमावलेल्यांची एकूण संख्या 140 झाली आहे.एकूण 565 रूग्णांवर उपचार सुरू असून,आजवर 4993 जण कोरोना आजारातून बरे झाले आहेत .