आषाढीतील स्वच्छता व ग्रामसभा दिंडीचा आज समारोप

पंढरपूर- आषाढी वारीत संत ज्ञानेश्‍वर व संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात जनजागृती करणार्‍या राज्य शासनाच्या ग्रामविकास व पाणी पुरवठा विभागाच्या स्वच्छता व ग्रामसभा दिंडीचा समारोप गुरूवारी सायंकाळी सहा वाजता येथील पंचायत समितीच्या प्रांगणात आयोजित कार्यक्रमात होणार असून यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहे.

11 जुलै रोजी सायंकाळी सहा वाजता होणार्‍या या कार्यक्रमास ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे मंत्री बबनराव लोणीकर, जलसंधारणमंत्री डॉ.तानाजी सावंत, सहकारमंत्री सुभाष देशमुख, पालकमंत्री विजयकुमार देशमुख, कृषिराज्य मंत्री सदाभाऊ खोत यांच्यासह जिल्हा परिषद अध्यक्ष संजय शिंदे, नगराध्यक्षा साधना भोसले, खासदार डॉ.जयसिध्देश्‍वर महास्वामी, खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर, अ‍ॅड.रामहरी रूपनवर, भारत भालके, बबनराव शिंदे, प्रशांत परिचारक, गणपतराव देशमुख, प्रणिती शिंदे, दत्तात्रय सावंत, सिध्दराम म्हेत्रे, नारायण पाटील हे आमदार उपस्थित राहणार आहेत.

या कार्यक्रमास राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता, पाणी पुरवठा विभागाचे सचिव शाम लाल गोयल, सचिव असिमकुमार गुप्ता, उपसचिव अभय महाजन, विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, ,जिल्हा परिषदेचे कार्यकारी अधिकारी डॉ.राजेंद्र भारूड, जिल्हा परिषद पदाधिकारी शिवानंद पाटील, विजयराज डोंगरे, मल्लीकाजर्र्ुन पाटील, रजनी देशमुख, शीला शिवशरण, पंचायत समिती सभापती राजेंद्र पाटील, उपसभापती अरूण घोलप, राहुल साकोरे उपस्थित राहणार आहेत.

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!