उद्योजक अभिजित पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक सामाजिक उपक्रम

पंढरपूर – धाराशिव साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांचा ३७ वा वाढदिवस अनेक सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला. पंढरपूर तालुक्यातील ४० गावामधील ग्रामपंचायत शिपाई , आरोग्य सेविका, आशाताई, अंगणवाडी सेविका यांचा कोविड योध्दा म्हणून सन्मान करण्यात आला. तसेच देगाव व पंढरपूर येथील रक्तदान शिबिरात ४५० जणांनी सहभाग घेतला.

तालुक्यातील वाखरी, देगाव, सुस्ते, उपरी, अजनसोंड, मगरवाडी,रोपळे, पटवर्धन कुरोली, पिराची कुरोली, चिंचणी, खेडभाळवणी, पळशी, नांदोरे, आव्हे यासह ४० गावामध्ये वृक्षारोपण करण्यात आले. तसेच मातोश्री वृध्दाश्रम, पालवी, अनाथ आश्रम या ठिकाणी सॅनिटायझर, मास्क , खाऊ वाटप करण्यात आले.

अभिजित पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शुक्रवारी देगाव येथे तर शनिवारी पंढरपूरमध्ये रक्तदान शिबिर घेण्यात आले. यात ४५० जणांनी सहभाग नोंदविला. पुढील काही दिवस अनेक गावांमध्ये रक्तदान आयोजित करण्यात आल्याची माहिती कार्यकारी संचालक अमर पाटील यांनी दिली.

कोरोनाच्या संकटकाळात नागरिकांना रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी विविध गावात आर्सेनिक अल्बम गोळ्याचे वितरण करण्यात आले आहे. तसेच कोरोनाच्या काळात आशावर्कर , आरोग्य ,ग्रामपंचायत कर्मचारी यांनी जी कामगिरी बजावली आहे याची दखल घेवून त्यांना भेटवस्तू देऊन कोविडयोद्धा म्हणून सन्मानित करण्यात आले. डिव्हीपी उद्योग समुहाचे सर्व पदाधिकारी व मित्र परिवाराच्या सहकार्याने हे उपक्रम पार पडले.

25 thoughts on “उद्योजक अभिजित पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक सामाजिक उपक्रम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!