कोरोनाकाळाच्या वर्षभरात समृध्दीकडून 511 सोनालिका ट्रॅक्टर्सची विक्री, महाराष्ट्रात मिळविला प्रथम क्रमांक

पंढरपूर , दि.1– कोरोना महामारी असताना देखील पंढरपूरच्या समृद्धी ट्रॅक्टर्सने सोनालिका कंपनीचे तब्बल 511 ट्रॅक्टर्सची एका वर्षात विक्रमी विक्री करत महाराष्ट्रात प्रथम क्रमांक तर देशात तिसऱ्या क्रमांकाचा बहुमान मिळविला आहे.
शेतकऱ्यांची सोनालिका ट्रॅक्टर्सला पहिली पसंती असल्याचे यावरून दिसून येत आहे. कोरोना संकटामुळेशेतकरी आर्थिक अडचणीत सापडला असताना त्यांना समृद्धी ट्रॅक्टरचे अभिजित पाटील यांच्या माध्यमातूनलकी ड्रॉ, शेतकरी सन्मान, ग्राहकांच्या घरी जाऊन सर्व्हिसिंग सेवा, ट्रॅक्टर खरेदीच्या विविध योजना राबवून सवलतीच्या दरात सोनालिका ट्रॅक्टर्स उपलब्ध करून देण्यात आले आहेत. सचोटीने व्यवसाय व सुयोग्य नियोजन करत शेतकरी बांधवांच्या अडचणी आपण दूर करू शकतो हे पाटील यांनी या माध्यमातून दाखवून दिले आहे.

याबाबत बोलताना उद्योजक अभिजित पाटील म्हणाले, कोरोनामुळे शेतकऱ्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत होते. ते लक्षात घेऊन जास्तीत जास्त सवलत देण्याचा प्रयत्न यावर्षभरात आम्ही केला. शोरूमच्या सर्व सेल्समन यांनी खूप परिश्रम घेतले. शेतकरी बांधवांनी खूप चांगला प्रतिसाद देत सोनालिका समृद्धी ट्रॅक्टरवर आपला विश्वास दाखवून दिला आहे. हा बहुमान आमचा नसून तो शेतकऱ्यांचा आहे.

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!