कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सर्वांचे सहकार्य आवश्यक, प्रशासनातर्फे लोकसहभागाचे आवाहन

सोलापूर, दि. 13: कोरोना विषाणू प्रसाराची साखळी तोडण्यासाठी संचारबंदीचा (लॉकडाऊन) निर्णय घेण्यात आला आहे. लॉकडाऊन यशस्वी होण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन आज प्रशासनातर्फे सर्वपक्षीय नगरसेवकांच्या बैठकीत करण्यात आले.

सोलापुरात 16 जुलै पासून पूर्ण संचारबंदी (लॉकडाऊन) लागू करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने चर्चा करण्यासाठी आज सर्वपक्षीय नगरसेवकांची जिल्हा प्रशासनातर्फे बैठक घेण्यात आली. त्यावेळी वरील आवाहन करण्यात आले. जिल्हानियोजनभवनच्या सभागृहात झालेल्या या बैठकीस जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, पोलिस आयुक्त अंकुश शिंदे, महानगरपालिकेचे आयुक्त पी. शिवशंकर, अतिरिक्त आयुक्त विजय खोराटे, उपायुक्त अजयसिंह पवार आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर म्हणाले, कोरोना प्रसाराची साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊन करण्यासाचा निर्णय करण्यात आला आहे. मात्र केवळ प्रशासन ही साखळी तोडू शकत नाही त्यासाठी नागरिकांची साथ आवश्यक आहे. लोकसहभागासाठी सर्व नगरसेवकांनी प्रयत्न करावे. आपआपल्या प्रभागात नागरिकांशी संवाद साधून लॉकडाऊन यशस्वी करण्यासाठी प्रशासनास सहकार्य करावे.

पोलिस आयुक्त अंकुश शिंदे म्हणाले, लॉकडाऊन यशस्वी होण्यासाठी नगरसेवकांनी आपली पक्षीय यंत्रणाही उपयोगात आणावी. आपल्या सर्वांना मिळुन कोरोनाची प्रसार साखळी तोडायची आहे. लॉकडाऊनसाठी शहर पोलीसांनी अतिशय काटेकोर नियोजन केले आहे. नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही. याची दक्षता घेण्यात येत आहे.

महापालिका आयुक्त पी.शिवशंकर म्हणाले, लॉकडाऊनबाबतचा सविस्तर आदेश उद्या जाहिर केला जाईल. लॉकडाऊन यशस्वी होण्यासाठी समाजाच्या सर्व घटकांचे सहकार्य अपेक्षित आहे.

बैठकीस महिला व बालकल्याण सभापती कुमुद अंकराम, नगरसेवक श्री.नागेश वल्याळ, अविनाश पाटील, नारायण बनसोडे, नागेश भोगटे, वंदना गायकवाड आदी उपस्थित होते.

दरम्यान, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज व्यापारी महासंघ, उद्योजक संघटना आणि विडी उत्पादक संघटनेचे पदाधिकारी यांचेशी चर्चा केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!