कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांची वर्षपूर्ती , 17 मार्च 2020 ला विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बंद झाली होती मंदिर

संपादकीय

गेले वर्षभर कोरोना नावाच्या विषाणूचा कहर जगभर पाहावयास मिळाला. भारतात याचा प्रादुर्भाव मार्च 2020 मध्ये जाणवू लागला तर महाराष्ट्रात मार्च महिन्याच्या मध्याला त्याने आपले रूप दाखविण्यास सुरूवात केली. 9 मार्चला पुण्यात पहिला रूग्ण आढळला आणि यानंतर 17 मार्चला प्रतिबंधात्मक उपाययोजना अंतर्गत गर्दीची ठिकाण असणारी मंदिर बंद करण्यात आली. पंढरीच्या श्री विठ्ठलासह तुळजापूर, कोल्हापूरची प्रसिध्द मंदिर या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी भाविकांना दर्शनासाठी बंद झाली. यानंतर 24 मार्चला राज्यात संचारबंदी पुकारण्यात आली. एक वर्षात लॉक व अनलॉकची स्थिती जनतेने पाहिली आहे. याची वर्षपूर्ती होत असताना कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढू लागला आहे ही चिंताजनक बाब आहे.

एक वर्षात कोरोना विषाणूने सर्वसामान्यांच्या अर्थकारणाला मोठा दणका दिला आहे. हातावर पोट असणाऱ्यांची स्थिती खूप खालावली आहे. हा संसर्गजन्य आजार असल्याने गर्दी टाळण्यावर भर दिला जातो. यामुळे व्यापारा व लहान व्यवसायांना याचा फटका बसतो. गतवर्षी 17 मार्च पासून लॉकडाऊनची स्थिती होती, यात अनेक बदल सतत घडले. कोरोनामुळे मोठ्या शहरांमध्ये काम करणा अनेक तरूण आपआपल्या घरी परतले. यातील अनेकांना नोकरी गमवावी लागली तर बचजण आजही ऑनलाइन काम करत आहेत. बऱ्याच लोकांनी मोठ्या शहरांमधून परत येवून आपले छोटे छोट घरगुती व्यवसाय थाटले आहेत. शाळा व कॉलेज ऑनलाइन सुरू आहेत. परीक्षा झाल्यानंतर पुढील वर्गही ऑनलाइनच सुरू आहेत. अनलॉक झाले मात्र पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने अनेक जिल्ह्यात लॉकडाऊनची स्थिती आहे. निर्बंध पुन्हा आणले जात आहेत.

कोरोनामुळे धार्मिक स्थळ बंद होती. जवळपास आठ महिन्यानंतर दिवाळीला ती सुरू झाली मात्र भाविकांच्या संख्येवर मर्यादा आणल्या गेल्या. कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांना बंधनकारक आहेत. आता राज्यात कोरोनाच वाढते रूग्ण पाहता मंदिरात होणारी गर्दी कमी झाली आहे. भाविक घरूनच देवाला नमस्कार करू लागले आहेत. कोरोनावरील लस देशात तयार झाली. सध्या या आजाराशी मुकाबला करणाऱ्यांना तसेच ज्येष्ठ नागरिक व 45 वर्षांवरील आजारी रूग्णांना ही लस दिली जात आहे. यानंतर सर्वसामान्यांचे लसीकरण सुरू होणार आहे.

कोरोनाचा रूग्ण महाराष्ट्रात 9 मार्च 2020 ला आढळून आला होता. यानंतर 17 मार्चला कोरोना प्रतिबंधासाठी निर्बंध लागू झाले, यानंतर देशव्यापी जनता कर्फ्यू पुकारला गेला व नंतर लॉकडॉऊन. अनेक महिने जनता घरात होती. परराज्यातील कामगारबंधू परत आपआपल्या गावी गेले. महाराष् हा कोरोनाचा हॉटस्पॉट बनला. राज्य सरकार व कर्मचाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात मेहनत घेवून कोरोनाचा प्रादुर्भाव कमी केला. जनतेने साथ दिली मात्र अनलॉक होताच पुन्हा मोठ्या शहरांमध्ये तसेच ग्रामीण भागात गर्दी वाढू लागली. अनेक दिवस ठप्प असणा व्यवसाय सुरू करण्यासाठी धडपड सुरू झाली. हाताला काम मिळावे म्हणून लोक बाहेर पडू लागले आणि पुन्हा कोरोनाने डोके वर काढले आहे. मागील काही दिवसात संख्या वाढत असल्याने राज्य सरकारने अनेक नियम केले आहेत.

कोरोनावरील लस जरी आली असली तरी मास्क , सॅनिटायझेशन व सुरक्षित अंतर पाळणे महत्वाचे आहे. यासाठी राज्य सरकार व प्रशासनाच्या प्रयत्नांना जनतेने साथ दिली पाहिजे. थांबून चालणार नाही मात्र प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी होणे आवश्‍यक आहे. कोरोनाच संकट मानवजातीवर आहे. ते कोणत्या एका भागापुरते , देशापुरते मर्यादित नसून जगभर याचा कहर आहे. भारताने कोरोनाच्या संकटाचा मुकाबला केला आहे. कोरोनाची सुरक्षित लस जगात निर्माण करणा आपणच आहोत. सहा सहा कंपन्यांची लसी आता उपलब्ध होत आहेत. जगभरातील अनेक देश भारतीय लसींचा वापर करत आहेत. हे कोरोना विषाणूचे संकट ही निघून जार्इल पण तोवर आरोग्यविषयक नियम पाळणे गरजेचे आहे.

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!