कोरोना बाधितांना उपचार नाकारणाऱ्या च‍िडगुपकर हॉस्प‍िटलच्या आठ जणांव‍िरुध्द गुन्हा

सोलापूर, दि. 15 – कोरोना बाध‍ित रुग्णांना गैरहजर राहून उपचार नाकारणाऱ्या च‍िडगुपकर हॉस्प‍िटलमधील वैद्यकीय अध‍िकारी आण‍ि कर्मचारी अशा आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. कोव‍िड 19 संन‍ियंत्रण अध‍िकारी धनराज पांडे यांनी ही माह‍िती द‍िली.
श्री. पांडे यांनी सांग‍ितले की, च‍िडगुपकर हॉस्प‍िटलमधील तीन डॉक्टर आण‍ि पाच कर्मचारी आज दवाखान्यात गैरहजर असल्याचे स्पष्ट झाले. या सर्वांव‍िरुध्द फौजदार चावडी पोलीस स्टेशनमध्ये कलम 122, 51 ब, 57, 269 आणि 336 यांच्या नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!