कौतुकास्पद : जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी पंढरपूरमधील पुरग्रस्तांना केली मदत
पंढरपूर- राष्ट्रवादी पक्षाचे जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी पक्षाच्या वतीने पंढरपूर मधील पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप केले. बारामती ऍग्रोचे व्हाईस चेअरमन सुभाष गुळवे यांच्या हस्ते आणि प्रांताधिकारी सचिन ढोले यांच्या उपस्थितीत केंद्रे महाराजांच्या मठात हे वाटप करण्यात आले.
संतपेठ भागातील सुमारे 1500 पूरग्रस्त कुटुंब केंद्रे महाराजांच्या मठात वास्तव्याला आहेत. आज दुपारी बारामती येथून ट्रक भर आणलेले चहा, साखर, डाळ, तांदुळ, मीठ, साबण आदी वस्तूंचे 5 किलोचे किट प्रत्येक गरजू कुटुंबाना देण्यात आले.
याप्रसंगी मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुधीर भोसले, युवकचे उपाध्यक्ष श्रीकांत शिंदे, संतोष सुळे, योगेश रणदिवे, सुरज पेंडाल, गणेश गोडसे आदी उपस्थित होते.
You got a very fantastic website, Glad I found it through yahoo.