खर्डीत अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची कृषी विभागाकडून पाहणी

अमोल कुलकर्णी

खर्डी- पंढरपूर तालुक्यातील खर्डी येथे बुधवार आणि गुरुवारी झालेल्या अतिपावसामुळे जे शेतीचे नुकसान झाले आहे याची पाहणी उपविभागीय कृषी अधिकारी शिवाजी तळेकर यांच्यासह तालुका कृषी अधिकारी राजेंद्र पवार आणि यांच्या पथकाने शेतीच्या बांधावर जाऊन केली.

यावेळेस द्राक्ष, डाळिंब,बोर तसेच मका,ऊस आदी पिकांचे झालेले नुकसान व त्या ठिकाणचे उतरवलेले पीकविमा यांचीही चौकशी करण्यात आली.जवळपास खर्डी व परिसरातील 90 टक्के शेतकऱ्यांनी विविध प्रकारचे पीक विमा उतरवले असल्यामुळे अतिवृष्टीची नुकसानभरपाई लवकरात लवकर मिळावी अशी मागणी शेतकरी करीत आहेत.

खर्डीतील गगनगिरी नगर तसेच सांगोला ओढा ते पंढरपूर ओढा दरम्यानच्या क्षेत्रातील पिकांचे झालेले नुकसान याचा पाहणी अहवाल तयार करून सोलापूर कृषी अधिकाऱ्यांकडे पाठवण्यात येणार असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी श्री. राजेंद्र पवार यांनी दिली.यावेळी खर्डीतील शेतकरी ग्रामस्थ तसेच नुकसानग्रस्त शेतकरी सचिन ताटे, मोहन रोंगे वकील ,धनंजय रोंगे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते उपस्थित होते.

गावात घराघरात पाणी

पंढरपूर ओढा अरुंद असल्याने गुरुवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसाने सखल भागात रात्री घरात पाणी शिरले. याची पाहणी खर्डीचे सरपंच रमेश हाके, उपसरपंच प्रणव परिचारक सदस्य बंडू रणदिवे यांनी केली. तसेच जेसीबीच्या सहाय्याने ओढा रुंदीकरण करून पाणी काढण्यात मदत केली.गावातील घरात पाणी शिरल्याने रात्रभर जनजीवन विस्कळीत झाले होते. काहींनी मंदिराचा आश्रय घेतला होता.

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!