गुरुवारी सोलापूर ग्रामीणमध्ये 503 रुग्ण वाढले, एकूण संख्या 22670

सोलापूर– सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात (महापालिकाक्षेत्र वगळून) गुरुवारी 24 सप्टेंबर रोजी एकूण 503 कोरोना रुग्ण वाढले आहेत. सर्वाधिक कोरोनाबाधित माळशिरस तालुक्यात 117 आढळले आहेत. दरम्यान ग्रामीण भागात आज 355 जणांनी कोरोनावर मात केली आहे. गुरुवारी जिल्हा ग्रामीणमध्ये 10 जणांनी कोरोनामुळे प्राण गमावले आहेत.कोरोनाचा प्रसार वेगाने होत असला तरी या आजारावर मात करून घरी परतणार्‍यांची संख्या ही दिवसेंदिवस वाढत आहे. दरम्यान ग्रामीण भागात कोरोनाबाधितांची एकूण संख्या 22670 इतकी झाली असून यापैकी 14930 जण कोरोनावर मात करून घरी गेले आहेत तर 7112 जणांवर उपचार सुरू आहेत. आज 355 जणांना घरी पाठविण्यात आले आहे. आजवर 628 जणांनी या आजारात प्राण गमावले आहेत.आजच्या अहवालानुसार 10 जण मयत आहेत.

पंढरपूर तालुक्यात 77 रुग्ण वाढले

पंढरपूर – गुरुवारी 24 सप्टेंबर रोजी आलेल्या जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या अहवालानुसार पंढरपूर शहर 18 व तालुक्यात 59 असे 77 कोरोनाबाधित रूग्ण वाढले आहेत.पंढरपूर शहर व तालुक्यात एकूण कोरोनाबाधितांची संख्या 4 हजार 459 झाली आहे. आजच्या अहवालानुसार 1 जण या आजारामुळे मरण पावले आहेत. आजवर कोरोनामुळे प्राण गमावलेल्यांची एकूण संख्या 109 झाली आहे.एकूण 1048 रूग्णांवर उपचार सुरू असून,आजवर 3302 जण कोरोना आजारातून बरे झाले आहेत .

247 thoughts on “गुरुवारी सोलापूर ग्रामीणमध्ये 503 रुग्ण वाढले, एकूण संख्या 22670

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!