ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध केल्यास गावाला एक लाखाचे बक्षीस, अभिजित पाटील यांची घोषणा


पंढरपूर – कोरोनामुळे पंढरपूर तालुक्याची खूप मोठी हानी झाली असून या आजाराचा अद्याप धोका संपला नाही. कोरोना व अतिवृष्टीचा यामुळे सर्वसामान्यांना आर्थिक व मानसिक फटका बसला आहे. अशा परिस्थितीत तालुक्यात अनेक ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत. यात जे आपली ग्रामपंचायत बिनविरोध करतील त्या गावास एक लाख रूपयांच बक्षीस देण्याचे नाविन्यपूर्ण उपक्रम धाराशिव कारखान्याचे अध्यक्ष तथा उद्योजक अभिजित पाटील यांनी जाहीर केला आहे.

येत्या 23 डिसेंबरपासून ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत सुरू होत असून 15 जानेवारी रोजी मतदान व 18 जानेवारीला मतमोजणी होणार आहे. या कालावधीत कोरोनाचा फैलाव वाढू नये व या आजाराने तसेच अतिवृष्टी आर्थिक संकटात सापडलेल्या ग्रामपंचायतीला आर्थिक झळ लागू नये ,यासाठी अभिजित पाटील यांच्या वतीने पंढरपूर तालुक्यात ज्या ग्रामपंचायत बिनविरोध होतील त्यांना 1लाख रू. बक्षीस म्हणून देण्यात येणार आहे.

प्रत्येकाने गावातील वाद विवाद, गट तट बाजूला ठेवत ग्रामपंचायत बिनविरोध करावी. गावातील होतकरू, निर्व्यसनी, तसेच शासकीय योजनाची माहिती असणार्‍या तरूणांनी व सर्व जेष्ठांनी यात सहभागी व्हावे. यातूनच गावाचा विकास होण्यासाठी हातभार लागेल. राज्यामध्ये शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे टोकाच्या विचारधारांचे तीन पक्ष एकत्र येऊन जर सरकार स्थापन करू शकतात तर आपल्याला आपल्या गावामध्ये आपली ग्रामपंचायत बिनविरोध का करू शकत नाही. ही विचार करण्याची बाब आहे.या उपक्रमामुळे पंढरपूर तालुका राज्यासमोर एक आदर्श निर्माण होवू शकतो.दरम्यान अभिजित पाटील यांच्या या उपक्रमाचे पंढरपूरसह अन्य तालुक्यात कौतुक होत आहे.

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!