चिंता वाढली : पंढरपूर तालुक्यात गुरूवारी 123 नवे कोरोना रूग्ण आढळले, तीनजणांचा मृत्यू  

पंढरपूर – एका बाजूला अन्य भागात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असताना पंढरपूर तालुक्यात मात्र रूग्णसंख्या थोडी वाढल्याचे चित्र असून गुरूवारी शहरात 26 तर ग्रामीण भागात 97 जण अशी एकूण 126 जणांची नोंद आहे. आजच्या अहवालानुसार ग्रामीणमधील तीन जणांचा मृत्यू झाला आहे.

जिल्हा ग्रामीणच्या अहवालानुसार 395 रूग्ण सापडले असून यात सर्वाधिक माळशिरस तालुक्यात 134 तर यापाठोपाठ पंढरपूर तालुक्यात 123 जणांचा समावेश आहे. पंढरपूरमधील कारोनाबाधितांची एकूण आकडेवारी आता 26 हजार 897 इतकी झाली असून आजवर 519 जणांनी या आजारात प्राण गमावले आहेत. सध 497 जणांना शहर व ग्रामीणमध्ये उपचार सुरू आहेत. शहरातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या आता 8 हजार 470 इतकी झाली असून येथे 184 जणांना कोरोनामुळे प्राण गमवावे लागले आहेत. तर ग्रामीणमध्ये आजवर 18 हजार 427 रूग्ण आढळून आले असून यापैकी 335 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या शहरातील 77 तर ग्रामीणमधील 420 जणांचा उपचार सुरू आहेत.

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!