जनतेच्या हाकेला धावून जाणारा लोकनेता हरपला : केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी वाहिली श्रध्दांजली

मुंबई दि. 28 – पंढरपूरचे आमदार भारत भालके यांच्या निधनाने अत्यंत मनमिळावू , जनसामन्यांच्या हाकेला धावून जाणारा कर्तृत्ववान लोकनेता आणि आमचा जवळचा मित्र हरपला आहे.अशा शब्दांत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री ना.रामदास आठवले यांनी भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे.

आमदार भारत भालके तीन वेळा आमदार म्हणून निवडून आले.पंढरपूर मंगळवेढा भागाचा विकास करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. त्यांना निवडणुकीत जायंट किलर म्हणून ओळखले जात होते. पंढरपूर च्या राजकीय सामाजिक वर्तुळात रांगडा राजकीय पैलवान म्हणून लोकप्रिय होते.त्यांचे आंबेडकरी चळवळीशी मित्रत्वाचे नाते होते. आमच्याशी त्यांचे घनिष्ठ मैत्रीचे संबंध होते.त्यांच्या जाण्याने केवळ राष्ट्रवादी काँग्रेसचे नुकसान झाले नाही तर आमचेही वैक्तिक मोठे नुकसान झाले आहे अशी शोकभावना ना. रामदास आठवले यांनी पाठविलेल्या शोकसंदेशात व्यक्त केली आहे.

भारत भालके लाेककल्याणासाठी झटणारे नेते

मी खासदार असताना भारत भालके हे आमदार हाेते. ते काँग्रेसचे आमदारही हाेते. मंगळवेढा-पंढरपूरचे ते नेतृत्व करत हाेते. त्यांचे कार्य जवळून पाहिले आहे, लाेकांच्या अचडणी साेडविण्यासाठी ते सदैव तत्पर असत. ते
काँग्रेसमध्ये असाेत, राष्ट्रवादीत असाेत सदैव लाेककल्याणाकरीता मेहनत घेत असत. कालच मी बाेललाे हाेताे. इतक्या लवकर ते साेडून जातील असे वाटले नव्हते. साेलापूर जिल्ह्यात सहकार क्षेत्रात त्यांनी केलेले काम, शेतकर-यांसाठी घेतलेली मेहनत साेलापूर जिल्हा कधीही विसरु शकणार नाही. त्यांना माझी मन:पूर्वक श्रध्दांजली.

-सुशीलकुमार शिंदे
(माजी केंद्रीय गृहमंत्री, भारत सरकार)

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!