पंढरपूर तालुक्याचा रविवारचा कोरोना स्कोर 152 तर जिल्हा ग्रामीणमध्ये 641 रूग्ण आढळले

पंढरपूर – रविवार 1 ऑगस्ट रोजी सोलापूर जिल्हा ग्रामीणमध्ये कोरोनाचे एकूण 641 रूग्ण आढळून आले असून यापैकी 152 पंढरपूर तालुक्यातील आहेत. आजच्या आरोग्य अधिकार्‍यांच्या अहवालानुसार आठ जणांचा मृत्यू जिल्हा ग्रामीणमध्ये नोंदला गेला आहे.
रविवारी माळशिरस तालुक्यात 124 यापाठोपाठ करमाळा 95, माढा 93 , सांगोला 57 तर मोहोळमध्ये 55 रूग्णांची नोंद आहे. 11 हजार 149 चाचण्या झाल्या असून यापैकी 10 हजार 508 निगेटिव्ह तर 641 पॉझिटिव्ह आहेत. जिल्हा ग्रामीणची एकूण रूग्णसंख्या ही 1 लाख 48 हजार 400 इतकी झाली असून यापैकी 3 हजार 135 जणांनी या आजारात आपले प्राण गमावले आहेत. आजवर 1 लाख 41 हजार 310 जणांनी कोरोनावर मात केली आहे तर सध्या 3 हजार 955 जणांवर उपचार सुरू आहेत.
सर्वाधिक रूग्ण पंढरपूर तालुक्यात 28 हजार 672 इतके आढळून आले असून यापैकी 535 जणांनी या आजारात आपले प्राण गमावले आहेत. सध्या तालुक्यातील 766 जणांवर उपचार सुरू आहेत. रविवारी शहरात 13 तर ग्रामीणमध्ये 139 रूग्ण आढळून आले असून ग्रामीमध्ये 2 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या शहरातील 133 तर तालुक्यातील 633 जण उपचार घेत आहेत.
WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!